ameesha patel
ameesha patel

आम्ही भांडतो, व्हॉटस्अ‍ॅपवर एकमेकांना ब्लॉकही करतो : अमिषा पटेल

Published on

अभिनेत्री अमिषा पटेल 'गदर-2' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी अमिषाने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. आताही ती तिच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या पुरुषासोबतच्या नात्यामुळे चर्चेत आली आहे.

अमिषा हिच्या आयुष्यातील तो पुरुष म्हणजे गदर-2 सिनेमाचे दिग्दर्शक अनिल शर्मा आहेत. यावर अमिषा म्हणाली. आम्ही भांडतो… व्हॉटस्अ‍ॅप आणि सोशल मीडियावर एकमेकांना ब्लॉकही करतो. पण आमचे नाते कधीही न तुटणारे आहे. आता आम्ही सोबत आहोत. आमचं नातं असेच आहे.

अमिषाने सोशल मीडियावर एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. यात अनिल शर्मा अमिषाचे कौतुक करत आहेत. येथे आमची 'सकिना' आली आहे. मला कळत नाही, दिवसेंदिवस तिचे सौंदर्य वाढत आहे. वयाच्या या टप्प्यावरही अमिषाचं सौंदर्य कमी झालेले नाही… सध्या अमिषाने पोस्ट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओ शेअर करत अमिषाने अनिल शर्मा यांचे आभार मानले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news