Shrirampur Sailor Stranded: दुबईजवळ समुद्रात जहाजावर श्रीरामपूरचा तरुण अडकला; कुटुंबीयांची प्रशासनाकडे मदतीची याचना

शारजा किनाऱ्यापासून 8 किमी अंतरावर 48 हजार टन गॅसचे जहाज थांबले; युद्धजन्य परिस्थितीमुळे हालचाल बंद
Shrirampur Sailor Stranded
Shrirampur Sailor StrandedPudhari
Published on
Updated on

श्रीरामपूर : शिपिंग कंपनीत नोकरीस असलेला श्रीरामपुरातील तरुण दुबईजवळील शारजा ते कुवैत दरम्यान समुद्रामध्ये जहाजावर अडकला आहे. 48 हजार टन गॅस असलेले हे जहाज शारजा शहरापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर समुद्रात थांबून ठेवले आहे.

Shrirampur Sailor Stranded
Shevgaon Prostitution Racket: शेवगावच्या राजयोग हॉटेलवर पोलिसांचा छापा; बांगलादेशी तीन तरुणींची सुटका

गणेश मुकुंद जाधव असे समुद्रात अडकलेल्या श्रीरामपुरातील तरुणाचे नाव आहे. श्रीरामपूर शहरातील वॉर्ड क्र. 7 मधील पूर्णवादनगर रहिवासी असलेला गणेश हा मुंबई येथील द ग्रेट इस्टर्न शिपिंग कंपनीत नोकरीस आहे. द ग्रेट इस्टर्न शिपिंग कंपनीचे जहाज गत आठवड्यात कुवैत येथे गेले होते. गणेश जाधव त्याच जहाजावर आहे. 48 हजार टन गॅस असलेले हे जहाज सुरक्षेच्या दृष्टीने शारजा शहरापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर समुद्रात थांबलेले आहे.

Shrirampur Sailor Stranded
Nomadic Children Education: दाखले नसल्याने भटक्या समाजातील मुलांचे शिक्षण अडचणीत; अकोल्यात दगड फोडण्याची वेळ

अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर जागतिक स्तरावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. जहाज कुवैत परिसरात असताना त्यांच्यापासून काही अंतरावर मिसाईलचे स्फोट झाले. जहाजावर गॅस असल्याने सुरक्षेच्यादृष्टीने हे जहाज समुद्रामध्ये थांबविण्यात आले आहे. भारत देशातील अनेक प्रवासी बाहेरच्या देशांमध्ये अडकलेले आहेत. श्रीरामपूर शहरातील पूर्णवादनगर येथील रहिवासी तथा हॉटेल व्यावसायिक मुकुंद जाधव यांचा मुलगा गणेश हादेखील जहाजावर अडकलेला आहे.

Shrirampur Sailor Stranded
Belapur Fake Baba Case: बेलापूर परिसरात भोंदूबाबाचा धिंगाणा?; महिलांच्या शोषणाच्या चर्चेनंतर अंनिस आक्रमक

आखाती देशांतील वाहतुकीवर युध्दाचा परिणाम झाला असून गणेशचे कुटुंब काळजीत पडले आहे. मुलगा गणेश सुखरूप घरी पोहचावा यासाठी त्याचे वडील मुकुंद यांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क करत मदतीची याचना केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती वरिष्ठ पातळीवरून पोहचवत मदतीसाठी प्रयत्न सुरू केल्याचे समजते. तीन महिन्यापूर्वीच गणेश इस्टर्न शिपिंग कंपनीत नोकरीवर रुजू झालेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news