Belapur Fake Baba Case: बेलापूर परिसरात भोंदूबाबाचा धिंगाणा?; महिलांच्या शोषणाच्या चर्चेनंतर अंनिस आक्रमक

देव अंगात संचारल्याचा दावा करून आर्थिक-मानसिक फसवणुकीचा आरोप; तक्रारींसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन
महिलांच्या शोषणा
महिलांच्या शोषणPudhari
Published on
Updated on

श्रीरामपूरः देव अंगात संचारला, असे भासवून काही भोंदूबाबा भक्तांचे आर्थिक, शारीरिक व मानसिक शोषण करीत असल्याची चर्चा सध्या बेलापूरसह परिसरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गैरप्रकारे भोंदूगिरी करणाऱ्या बाबांसंदर्भात तक्रारी असल्यास अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन ‌‘अंनिस‌’च्या राज्य सचिव ॲड. रंजना गवांदे, बाबा आरगडे व देविदास देसाई यांनी केले आहे.

महिलांच्या शोषणा
Shrirampur Chavan family accident: चव्हाण कुटुंबाचा पाचवा बळी गेला; 9 दिवसांनंतर जखमी महिलेचा मृत्यू

‌‘अंनिस‌’ने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात ॲड. गवांदेंसह आरगडे व देसाई यांनी म्हटले आहे की, बेलापूरातील एका भोंदूगिरी करणाऱ्या बाबाने काही महिलांचे लैंगिक शोषण केल्याची चर्चा परिसरात सुरु आहे. बाबांच्या भितीसह इज्जतीमुळे पिडित महिला तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. आर्थिक व शारीरिक फसवणूक

महिलांच्या शोषणा
Maize MSP Payment Delay: वांबोरी परिसरातील मका उत्पादकांचे पेमेंट रखडले

झालेल्या महिलांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते अथवा पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. भोंदू बाबाची भोंदूगिरी समाजासमोर उघड करुन, त्यांच्याविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. भोंदूबाबाविरुद्ध कारवाई करण्यासाठी ‌‘अंनिस‌’ने आक्रमक पावले उचलली आहेत.

महिलांच्या शोषणा
Sanjay Malpani Abu Dhabi Experience: युद्धस्थितीत आबुधाबीत अडकलेले संगमनेरचे उद्योजक; संजय मालपाणींचा अनुभव

भोंदूबाबाने भक्तांकडून मोठ्या रकमा वसूल केल्या आहेत, अशी चर्चा सुरु आहे. या बाबांकडे येणाऱ्यांमध्ये काही राजकीय पुढाऱ्यांचा समावेश आहे. पुढाऱ्यांच्या आश्रयाखाली बाबा महिलांचे लैंगिक शोषण करतो, अशी माहिती ‌‘अंनिस‌’ कार्यकर्त्यांना मिळाली आहे. भोंदूबाबांचे कारनामे दडपण्यासाठी मदत करणाऱ्या पुढाऱ्यांची नावेदेखील उघड करणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर ‌‘अंनिस‌’ राज्य सचिव अँड. रंजना गवांदे, बाबा आरगडे, देविदास देसाई व छाया बंगाळ आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news