Shirdi Pedha Seizure: शिर्डीत एफडीएची मोठी कारवाई; 600 किलो निकृष्ट पेढे जप्त, दोन लाखांचा साठा नष्ट

साईमंदिर परिसरातील पेढा विक्री केंद्रे आणि उत्पादन युनिट्सवर धाड; भाविकांच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
Shirdi Pedha Seizure
Shirdi Pedha SeizurePudhari
Published on
Updated on

नगर: साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना प्रसादाच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे पेढे विकले जात असल्याच्या तक्रारींची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शिर्डीत बुधवारी (दि. २४) मोठी कारवाई केली. साईमंदिर परिसरातील पेढा विक्री केंद्रे तसेच पेढा उत्पादन करणाऱ्या आस्थापनांवर टाकलेल्या धाडीत 600 किलोहून अधिक संशयित व निकृष्ट दर्जाचा पेढा जप्त करण्यात आला. सुमारे दोन लाख रुपये किमतीचा हा साठा जागेवरच नष्ट करण्यात आला.

Shirdi Pedha Seizure
Ahilyanagar Police Transfers: अहिल्यानगर पोलिस दलात मोठा फेरबदल; 58 अधिकारी बदलले

प्रसाद म्हणून विकल्या जाणाऱ्या पेढ्यांच्या गुणवत्तेबाबत भाविक आणि नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत होत्या. यापूर्वीही अन्न व औषध प्रशासनाने काही ठिकाणी तपासणी करून नमुने प्रयोगशाळेकडे पाठविले होते. मात्र, बुधवारी राबविण्यात आलेल्या व्यापक तपासणी मोहिमेत मोठ्या प्रमाणावर संशयित पेढ्यांचा साठा आढळून आल्याने प्रसाद विक्री व्यवसायातील गैरप्रकार पुन्हा एकदा उघड झाले आहेत.

Shirdi Pedha Seizure
Fifth Standard Approval Rule: पटसंख्येच्या नव्या नियमामुळे जिल्ह्यातील 60 गावांतील पाचवीचे वर्ग अडचणीत

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सकाळपासूनच साईमंदिर परिसरातील विविध पेढा दुकाने आणि उत्पादन युनिट्सची कसून तपासणी केली. तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी संशयास्पद पेढा आढळून आल्याने त्याचे नमुने ताब्यात घेण्यात आले.

Shirdi Pedha Seizure
Deolali Pravara Cow Death: देवळाली प्रवरात वीजतारा तुटून आठ गायींचा मृत्यू; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

एफडीएच्या अधिकारी अपर्णा भोईटे यांनी सांगितले की, अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांच्या आदेशानुसार ही विशेष कारवाई करण्यात आली. पेढा विक्री केंद्रे तसेच उत्पादन करणाऱ्या आस्थापनांची तपासणी करून नमुने संकलित करण्यात आले असून त्यांची पुढील तपासणी करण्यात येणार आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अशाच प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहतील, असा इशाराही त्यांनी दिला.

Shirdi Pedha Seizure
Ahilyanagar Monsoon Rain: अहिल्यानगर जिल्ह्यात मान्सूनची दमदार हजेरी; पावसाने बळीराजाला दिलासा

दरम्यान, शिर्डीत दररोज हजारो तर सण-उत्सवाच्या काळात लाखो भाविक प्रसाद म्हणून पेढ्यांची खरेदी करतात. अशा परिस्थितीत श्रद्धेच्या नावाखाली निकृष्ट दर्जाच्या पदार्थांची विक्री होत असल्याचे समोर आल्याने भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news