Ahilyanagar Monsoon Rain: अहिल्यानगर जिल्ह्यात मान्सूनची दमदार हजेरी; पावसाने बळीराजाला दिलासा

संगमनेर, लोणी, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस; रखडलेल्या खरीप पेरण्यांना मिळाली आशा
Ahilyanagar Monsoon Rain
Ahilyanagar Monsoon RainPudhari
Published on
Updated on

नगर: मोठ्या प्रतीक्षेनंतर मान्‍सूनने अहिल्‍यानगर शहरासह जिल्ह्यात सर्वदूर कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. संगमनेर, लोणी, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा आदी तालुक्‍यांसह विविध भागांत मध्‍यम स्‍वरूपाचा पाऊस झाला. गेल्‍या काही दिवसांपासून उन्‍हाच्‍या तडाख्‍याने बेजार झालेल्‍या नागरिकांना आणि पेरणीसाठी चातकासारखी वाट पाहणार्‍या बळीराजाला काहींसा दिलासा मिळाला आहे.

Ahilyanagar Monsoon Rain
Bhausaheb Wakchaure: वाय प्लस सुरक्षेत शिर्डीत दाखल झाले खा. भाऊसाहेब वाकचौरे; ठाकरे गटाच्या आक्रमक भूमिकेमुळे कडेकोट बंदोबस्त

गेल्‍या २४ दिवसांत सरासरी ८० मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना फक्‍त २४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. बहुतांश तालुक्‍यांत ५ मिलिमीटरदेखील पावसाची नोंद नाही. पेरणीजोगा पाऊस नसल्‍याने खरीप पेरणी रखडली आहे. त्‍यामुळे जिल्‍हाभरात चिंतेचे वातावरण आहे.

Ahilyanagar Monsoon Rain
Ahilyanagar Industrial Project: अहिल्यानगरच्या हरेगाव मळ्यात ४२०० एकर जागेवर संरक्षण व ऊर्जा प्रकल्प; जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना

मंगळवारी (दि.२३) मान्‍सूनचे आगमन झाले. अहिल्‍यानगर शहरात दुपारी पावसाने हजेरी लावली. संगमनेर शहरासह तालुक्‍यात पाऊस झाला. राहाता तालुक्‍यातील लोणी, कोल्‍हार, बाभळेश्‍वरसह काही गावांत पाऊस झाला. श्रीरामपूर तालुक्‍यात शहरासह काही गावांत, तसेच राहुरी, नेवासा तालुक्‍यांत पावसाने हजेरी लावली.

Ahilyanagar Monsoon Rain
PM Kisan Samman Nidhi: पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता जमा; जिल्ह्यातील 5.66 लाख शेतकऱ्यांना 111 कोटींचा लाभ

दरम्यान मंगळवारी (दि.२३) सकाळी १० वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी १.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शेवगाव तालुक्‍यात सरासरी ५.८, पारनेर, श्रीगोंदा तालुक्‍यात प्रत्‍येकी २.९, कर्जत ३.४, संगमनेर १, कोपरगाव ३.४ तर राहाता तालुक्‍यात १ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news