

नगर: जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी गेल्या आठवड्यात प्रभारी पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करून मोठ्या फेरबदलाचे संकेत दिल होते. आता पुन्हा पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक अशा 58 अधिकाऱ्यांच्या बदल्या करून जिल्हा पोलीस प्रशासनात फेरबदल केले.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, प्रशासनाची निकड पाहून पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी बदल्यांचे आदेश दिले.अहिल्यानगर जिल्हा पोलिस दलात प्रशासकीय कारणास्तव आणि विनंतीनुसार मोठ्या प्रमाणावर अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.
२१ जून २०२६ रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय पोलिस आस्थापना मंडळाच्या बैठकीत झालेल्या सखोल चर्चेनंतर 58 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय घेण्यात आला. पोलिस निरीक्षकांच्या बदल्या :पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ (नियंत्रण कक्ष ते द.वि.प, अहिल्यानगर), विजय देशमुख (नियंत्रण कक्ष ते जिल्हा विशेष शाखा), संतोष भंडारे (जिल्हा विशेष शाखा ते नियंत्रण कक्ष).
नव्याने जिल्ह्यात आलेल्या सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या :
सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप एकशिंगे (तोफखाना), शंकर मुटेकर (शेवगाव), विशाल चिटणीस (कोतवाली), रोहन खंडागळे (पाथर्डी), चेतन लोखंडे (श्रीरामपूर शहर), विकास ढोकरे (संगमनेर शहर), दीपक धनवटे (शनिशिंगणापूर), अजिनाथ कोठाळे (आर्थिक गुन्हे शाखा), नरहरी फड (आर्थिक गुन्हे शाखा), अजित मोरे (जामखेड), कल्पेशकुमार चव्हाण (शिर्डी). सहसयक पोलिस निरीक्षक जगदीश मुलगीर (राहुरी), सोमनाथ दिवटे (पारनेर), संदीप वसावे (नेवासा), मंगेश गोंटला ( पाथर्डी), रमीझ मुलाणी (वाचक पोलिस अधीक्षक कार्यालय), अशोक काटे (कर्जत) यांचीही बदली करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक पूनम श्रीवास्तव(तोफखाना ते कोतवाली) तर, सहायक पोलिस निरीक्षक वर्षाबाई जाधव, गणेश अहिरे यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.
पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या :
पोलिस उपनिरीक्षक विकास जाधव, कृष्णकुमार सेंदवाड, संदीप दरवडे (स्थानिक गुन्हे शाखा), प्रविण पाटील (तोफखाना), सुरज मेढे (संगमनेर शहर), मनोज आहिरे (राहुरी), विलास जाधव (शेवगाव), मनोहर खिळदकर(एमआयडीसी), आण्णासाहेब परदेशी (श.वा.शा) मनोज आहिरे (राहुरी), विलास जाधव (शेवगाव) समाधान फडोळ (आश्वी), मनोज मोंढे (नगर तालुका), शितल मुगडे (श्रीरामपूर), प्रदीप बोऱ्हाडे( शिर्डी) यांच्यासह 58 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या आधिकाऱ्यांना तत्काळ हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तत्काळ हजर न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, आदेशात म्हटले आहे.