Municipal Election Campaign Rates: बिर्याणी 150, तर मांसाहारी फ्लेट 240 रुपयांना; पालिका प्रचार साहित्याचे दर निश्चित

नगर जिल्ह्यातील 12 नगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू; उमेदवारांना प्रचार खर्च मर्यादेत ठेवण्याचे निर्देश
पालिका प्रचार साहित्याचे दर निश्चित
Election Campaign|पालिका प्रचार साहित्याचे दर निश्चितPudhari
Published on
Updated on

नगर : जिल्ह्यातील बारा नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. उमेदवारांना निवडणूक खर्चांची मर्यादा घालून देण्यात आली असून, जाहीर प्रचारासाठी निवडणूक यंत्रणेने प्रचार साहित्य व भोजनावळींचे दर निश्चित केले आहेत. या दरानुसारच उमेदवारांना अंतिम खर्च सादर करणे बंधनकारक आहे. प्रचार कालावधीत बिर्याणी 150 रुपये, राईस प्लेट स्पेशल 180 रुपये तर मांसाहारी प्लेट 240 रुपये, वडापाव 15 रुपये असे दर निश्चित केले आहेत.(Latest Ahilyanagar News)

पालिका प्रचार साहित्याचे दर निश्चित
Leopard Attack Khare Karjune: खारे कर्जुने येथे बिबट्याचा हल्ला; चिमुरडीला उचलून नेल्याने ग्रामस्थांत भीतीचं वातावरण

जिल्ह्यातील श्रीरामपूर, संगमनेर व कोपरगाव या तीन नगरपालिका ब वर्ग असून, शिर्डी, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, जामखेड या आठ नगरपालिका क वर्ग दर्जाच्या आहेत. या अकरा पालिका आणि नेवासा नगरपंचायत अशा बारा पालिकांच्या 2 डिसेंबर रोजी निवडणुका होणार आहेत. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल होताच उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचे मीटर सुरु होणार आहे. या निवडणुकीत नगराध्यक्ष व नगरसेवकपदांच्या उमेदवारांनी निवडणूक खर्च किती करावयाचा याची मर्यादा घालून दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक खर्च झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

पालिका प्रचार साहित्याचे दर निश्चित
Sangamner Municipal Election 2025: संगमनेरात जाहीरनाम्यांसोबत आश्वासनांचा पाऊस

उमेदवारांना दररोजचा निवडणूक खर्च सादर करावा लागणार आहे. प्रचारात किती वाहने, खुर्च्या वापरण्यात आल्या. सभेत वा मिरवणुकांत शाल, फेटा, बॅनर आदींबरोबरच कार्यकर्त्यांचा चहापान, भोजनावळींवरील खर्च तसेच जाहिरातींवरील खर्च देखील निवडणूक खर्चात धरण्यात येणार आहे. निवडणूक कालावधीत उमेदवारांनी अंगरक्षक वापरल्यास त्यासाठी दररोजचा एक हजार रुपये खर्चात धरले जाणार आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी बुधवारी (दि.12) प्रचार साहित्याचे दर निश्चितीसाठी राजकीय पक्षांच्यानेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत गेल्या विधानसभेसाठी जे दर निश्चित करण्यात आले होते. तेच आता लागू केले आहेत. निवडणूक यंत्रणेने लागू केलेल्या दरानुसारच उमेदवारांना खर्च सादर करणे बंधनकारक असणार आहे.

पालिका प्रचार साहित्याचे दर निश्चित
Ahilyanagar Municipal Corporation Election: नगर महापालिका आरक्षणात विद्यमानांची पंचाईत! सौभाग्यवती पुढे, मिस्टर आता मैदानाबाहेर

भोजन आणि नास्ता

चहा : 10, कॉफी : 15, बॉटलपाणी :17, भजी : 20, समोसा : 15, पॅटीस 15, मिसळपाव : 60, पोहे : 20, डोसा : 50, पावभाजी : 60, साबुदाना खिचडी : 25, कोल्डड्रीक :15, जार 40, राईस प्लेट : 115, राईस प्लेट स्पेशल :180, मांसाहारी फ्लेट : 240, बिर्याणी : 150.

उमेदवारांना प्रचार खर्चाची मर्यादा

ब वर्ग नगरपालिका :-

नगराध्यक्ष : 11 लाख 25 हजार रु.

नगरसेवक : 3 लाख 50 हजार

क वर्ग नगरपालिका :-

नगराध्यक्ष : 7 लाख 50 हजार रुपये

नगरसेवक : 2लाख 50 हजार

नगरपंचायत :-

नगराध्यक्ष : सहा लाख रुपये,

नगरसेवक : 2 लाख 25 हजार रु.

पालिका प्रचार साहित्याचे दर निश्चित
Municipal Election: पाथर्डी-शेवगावमध्ये निवडणूक अर्जाचा पहिला दिवस; उमेदवारांचे कागदपत्री गोंधळ!

प्रचार साहित्याचे दर (रुपये)

फ्लेक्स (20बाय 12) 12 रुपये, पोस्टर (एफोर साईज) 6000, कॅप: 85, गांधी टोपी 10, उमेदवार कार्यालय : 50 हजार, मंगल कार्यालय (दिवसाला) : 20 ते 25 हजार . एक माईकस्पीकरसह : 1500, व्हिडीओग्रॉफी (दिवस) 1389, ड्रोन कॅमेरा (दिवस) 6000, क्रेन: 13250, बॅन्डबाजा : 500, कापडी बॅनर (प्रतिस्केअरमीटर) : 300, कटआऊट : 12.10, स्टेज (प्रतिस्केअर फुट) : 25, मंडप 15, स्वागत गेट : 8000, जेसीबी फुलासह : 1500, छोटा हार :10, मोठा हार : 80, खुर्ची : 10, खुर्ची कुशन : 30, सोफासेट (व्हीआयपी) : 1500, जनरेटर : 15000, हॅलोजन बल्प : 150

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news