Sangamner Fake Medicines Case: मोहन पुरीची औषधे प्रयोगशाळेत बनावट; राजेंद्र गडगेविरोधातही पीसीपीएनडीटी कायद्यान्वये गुन्हा

औषधे हानिकारक असल्याचा प्रयोगशाळेचा अहवाल; गडगे, पुरी यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्याचे आदेश
Rajendra Gadge
Rajendra GadgePudhari
Published on
Updated on

संगमनेर: मोहन पुरीच्या औषधांची प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते बनावट आढळले, तर राजेंद्र गडगे याने भक्तांना मुलगा होण्याबाबत उपाय व आश्वासन दिले, त्यामुळे त्यांच्याविरोधात संगमनेर न्यायालयात पी.सी.पी.एन.डी.टी. अँक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात झाल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सरचिटणीस ॲड. रंजना गवांदे यांनी दिली. दरम्यान, भोंदू राजेंद्र गडगे व मोहन पुरी यांना कोर्टात हजर राहण्याबाबत समन्स बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Rajendra Gadge
Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँकेवर भाजपची नजर; जागावाटपापासून अध्यक्षपदापर्यंत रंगणार ‘बार्गेनिंग’

मोहन पुरी याच्या जायगाव (ता. सिन्नर, जि. नाशिक) येथील औषध निर्मिती प्रकल्पाचा पंचनामा करून काही औषधांचे नमुने संबंधित प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. त्यातले काही औषध बनावट व हानिकारक असल्याबाबत प्रयोगशाळेचा अहवाल आला आहे. त्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी संगमनेर येथील न्यायालयात गुन्हा दाखल केला आहे. त्यात न्यायालयाने भोंदू राजेंद्र गडगे व मोहन पुरी यांना कोर्टात हजर राहण्याबाबत समन्स काढण्याचा आदेश केला आहे.

Rajendra Gadge
Ahilyanagar District Bank Election: सहकारमंत्री बाबासाहेब पाटील संचालकपदावरून हटले; नगर जिल्हा बँकेच्या राजकीय समीकरणांवर परिणाम

आश्रमातून भक्तांना भावनिक आश्वासने

राजेंद्र गडगे याने वडगाव पान येथे आश्रमात येणाऱ्या भक्तांना मुलगा होण्याबाबत उपाय व आश्वासन दिले होते. त्यासंबंधाने अनेक व्हिडीओ उपलब्ध होते. त्याआधारे गडगेविरुद्ध संगमनेर न्यायालयात पी.सी.पी.एन.डी.टी. ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला असल्याचे ॲड गवांदे यांनी सांगितले. भोंदू राजेंद्र बापू गडगे याचे विरोधात १७ एप्रिल २०२६ रोजी संगमनेर ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.

Rajendra Gadge
Retired Colonel Fraud: फ्लॅट न देता निवृत्त कर्नलची १३.९२ लाखांची फसवणूक; चार जणांविरुद्ध गुन्हा

ती’ औषधे बनावटच; अहवाल आला!

पोलिस व अन्न व औषध प्रशासनाने मोहन पुरी याचा औषध निर्मिती प्रकल्पाचा पंचनामा करून नमुने संबंधित प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. त्यातले काही औषध बनावट व हानिकारक असल्याबाबत प्रयोग शाळेचा रिपोर्ट आला आहे. त्यासंबंधाने संबंधित अधिकाऱ्यांनी संगमनेर येथील न्यायालयात गुन्हा दाखल केला आहे.

Rajendra Gadge
Bhamathan Illegal Sand Transport: भामाठाणमध्ये अवैध वाळू वाहतूक व साठ्यावर कारवाई; १४.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

राजेंद्र गडगे याचे विरोधात गर्भलिंग चिकित्सेविरोधात कायद्यानुसार संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल होणे, गडगे याचा आश्रम, बँक खाते, वाहन, औषध गोडाऊन व जाहिरातीसाठी वापरले जाणारे साहित्य, रेकॉर्डिंग रूम हे सर्व पोलिसांनी सील करणे, या सर्व घटना गुन्ह्यातील तपासाच्या दृष्टीने सकारात्मक आहेत.

अँड रंजना गवांदे, अनिस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news