Retired Colonel Fraud: फ्लॅट न देता निवृत्त कर्नलची १३.९२ लाखांची फसवणूक; चार जणांविरुद्ध गुन्हा

बुकिंगपोटी घेतले पैसेही परत केले नाहीत; दरेवाडीत २०१३ पासून फसवणुकीचा प्रकार
Money
MoneyPudhari
Published on
Updated on

नगर: फ्लॅट खरेदीसाठी अ‍ॅग्रीमेंट करून अ‍ॅडव्हान्स बुकिंगचे पैसे घेतल्यानंतर न फ्लॅट दिला ना पैसे परत केले, अशा प्रकारे आर्थिक फायद्यासाठी एका निवृत्त कर्नलची १३ लाख ९२ हजार ६२५ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १३ मे २०१३ ते १८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत अहिल्यानगर-सोलापूर रोडवरील दरेवाडी (ता. जि. अहिल्यानगर) येथे हा फसवणुकीचा प्रकार घडला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Money
Gorakh Dhanwate Rescue: ५० फूट खोल, तीन फूट रुंद विहिरीत दोन दिवस; बंद मोबाईल अचानक सुरू झाला अन्‌ वाचला जीव!

सतीश वामन गिरी (रा. कोथरूड, पुणे), दिलीप प्रेमराज चंडक (रा. आदर्शनगर, बेळगाव, कर्नाटक), सुशिल हनुमानदास सारडा (रा. सारडा लेन, अहिल्यानगर), सुयश रविंद्र लुणावत (रा. आयसीएस कॉलनी, भोसले नगर, पुणे) असे संशयित आरोपींची नावे आहेत.

Money
Ahilyanagar District Bank Election: जिल्हा बँकेच्या उर्वरित सात जागांसाठीही चुरस; राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू

याबाबत सेवानिवृत्त कर्नल भोम प्रकाश दुबे (रा. सारसनगर, ता. जि. अहिल्यानगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. एल.एस.व्ही.एस डेव्हलपर्स या कंपनीच्या आरोपी संचालकांनी फिर्यादी दुबे यांच्याकडून फ्लॅट खरेदी करण्याकरिता अ‍ॅग्रीमेंट करून बुकिंगपोटी एकूण १३ लाख ९२ हजार ६२५ रुपये घेतले होते.

Money
Bhamathan Illegal Sand Transport: भामाठाणमध्ये अवैध वाळू वाहतूक व साठ्यावर कारवाई; १४.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

मात्र, ठरल्याप्रमाणे फ्लॅट न देता आणि घेतलेली रक्कम परत न करता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विश्वासघात करून फसवणूक केली. फिर्यादीने दिलेल्या अर्जाच्या चौकशीवरून १८ सप्टेंबर २०२६ रोजी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश पवार करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news