Sangamner Gadge Case: संगमनेरचा भोंदू गडगे गडगंज; कोट्यवधींची मालमत्ता उघड

डॉ. मोहन पुरी मास्टरमाइंड; प्लँट सील, पोलिसांचा तपास वेगात
Rajendra Gadge
Rajendra GadgePudhari
Published on
Updated on

संगमनेर: संगमनेरच्या वडगावपानमधील दुसरी शिकलेला भोंदू राजेंद्र गडगेही गडगंज असल्याची माहिती पोलिस तपासात समोर येत आहे. अहिल्यानगर, संगमनेर, नेवासा, राहाता येथे त्याची स्थावर मालमत्ता असून बँका, पतसंस्थेत दहा खाती आहेत. त्याचा शोध घेऊन मूल्यांकन काढण्यात येत असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. दरम्यान, डॉ. मोहन पुरीचा सिन्नरमधील औषध निर्मितीचा प्लँट सील करण्यात आला असून न्यायालयाच्या आदेशाने त्याची तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Rajendra Gadge
Jamkhed Mohari Dam Repair Tender: मोहरी तलाव दुरुस्तीला गती; 3.02 कोटींची निविदा जाहीर

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) पाठपुराव्यानंतर वडगावपानच्या राजेंद्र गडगेवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. कर्करोग बरा करतो असा दावा करणारा गडगे हा मूल होण्यासाठी औषधोपचार करत असल्याचाही आरोप आहे. गडगेच्या अटकेनंतर त्याचा साथीदार डॉ. मोहन पुरीसह तिघे पसार आहेत. पोलिसांनी डॉ. पुरीची कुंडली काढली असता नाशिक जिल्ह्यात त्याच्यावर चार गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.

Rajendra Gadge
Ahilyanagar Police Cattle Rescue: राहुरी-राशिनमध्ये 11 गोवंशीयांची सुटका; पोलिसांची मोठी कारवाई

सिन्नर येथे पुरीचा औषध निर्मितीचा प्लँट आहे. तेथे तो औषध बनवत होता. हा प्लँट सील करण्यात आला असून न्यायालयाच्या आदेशाने तपासणी केली जाणार आहे. पसार डॉ. पुरीच्या मागावर पोलिस असून, सिन्नर परिसरात त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, गडगेचा दत्तधाम सरकार आश्रम सील करण्यात आला असून आश्रमातील सीसीटीव्ही फुटेज, हार्ड डिस्क, लॅपटॉप जप्त करत तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आले आहेत. भोंदू गडगे संदर्भात पोलिस सर्व अंगांनी तपास करत आहेत. कोणी फिर्याद देण्यास पुढे आले तर गडगे याच्या विरोधात आणखी गुन्हे दाखल होऊ शकतात.

Rajendra Gadge
Kopargaon Municipal Meeting Decisions: कोपरगाव पालिकेचे 29 निर्णय; जलतलावांवर CCTV, प्लास्टिकवर बंदी

गडगेच्या अहिल्यानगर, नेवासा, राहाता आणि संगमनेरात तेरा मालमत्ता आहेत. या मालमत्ता स्वत:सोबतच पत्नी आणि मुलांच्या नावाने आहेत. राष्ट्रीयीकृत बँक, पतसंस्थेत गडगेची दहा खाती आहेत. त्याचा तपशील जमा केला जात आहेत. पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. पोलिसांकडून त्यादृष्टीने चाचपणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Rajendra Gadge
Rahuri Bypoll Voting: राहुरी पोटनिवडणूक; 56.20% मतदान, 4 मे रोजी मतमोजणी

डॉ. मोहन पुरीच मास्टरमाइंड

वडगावपानमधील भोंदूगिरीचा मास्टरमाइंड हा डॉ. मोहन पुरी असल्याचे समोर येत आहे. तो पसार असून त्याला अटक केल्यानंतर आणखी खुलासे होतील, असे अपर पोलिस अधीक्षक वाघचौरे यांनी सांगितले.

सोशल हॅण्डलिंगसाठी स्पेशल टीम

भोंदू गडगे याने सोशल मीडिया हॅण्डल करण्यासाठी स्पेशल टीम तयार केली होती. ही टीम भोंदू गडगेचे ब्रँडिंग करत होती. दुसरी शिकलेल्या गडगेचे अनेक व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्याने डिलीट केलेले व्हिडीओदेखील पोलिसांनी रिकव्हर केले आहेत. त्याची तपासणी सुरू असल्याचे वाघचौरे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news