Kopargaon Municipal Meeting Decisions: कोपरगाव पालिकेचे 29 निर्णय; जलतलावांवर CCTV, प्लास्टिकवर बंदी

आरोग्य-सुरक्षेला प्राधान्य; बायोमेडिकल वेस्टसाठी इनसिनरेशन प्लांटचा प्रस्ताव, विकासकामांना गती
CCTV Camera
CCTV CameraPudhari
Published on
Updated on

कोपरगाव: नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने पाणी साठवण तलाव परिसरात सीसीटीव्ही व्यवस्था उभारण्याचा निर्णय झाला. तसेच पाच नंबर तळ्याचे प्रलंबित काम तातडीने पूर्ण करण्याबाबत संबंधित कंत्राटदारास सूचना देण्यात आल्या आहे. येथील नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पराग संधान यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पालिकेच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीत नगरपालिका स्तरावरील विविध विकासकामांसंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

CCTV Camera
Rahuri Bypoll Voting: राहुरी पोटनिवडणूक; 56.20% मतदान, 4 मे रोजी मतमोजणी

याप्रसंगी नगराध्यक्ष पराग संधान म्हणाले, युवा नेते विवेककोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचा विश्वास नामापूर्तीकडे सध्या नगरपरिषदेची वाटचाल सुरू असून, नगरपरिषद हद्दीमध्ये नागरिकांच्या दृष्टीने हितकारक निर्णय घेण्यास सुरुवात झाली आहे. या बैठकीत पाणीपुरवठा विभाग, विद्युत विभाग, मार्केट विभाग, नगररचना विभाग, कर विभाग, स्वच्छता विभाग तसेच बांधकाम विभाग यांच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विषयांवर चर्चा करून कामे पूर्ण करण्याबाबत निर्णय घेण्यात आले. शहरातील जलकुंभांच्या संरक्षणासाठी आवश्यकतेनुसार बार्बड वायर फेन्सिंग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पाणीपुरवठा विभागातील येसगाव येथील तलावातील जलमापक यंत्राची देखभाल व दुरुस्ती करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, तसेच गटनेते, सभापती, सर्व नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

CCTV Camera
Ashok Kharat: भोंदू अशोक खरात प्रकरणात शिर्डी हॉटेल कनेक्शन; ‘मेरी गोल्ड’वर ईडीचा छापा

नगरपरिषद हद्दीतील विविध प्रभागांमध्ये रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या तसेच विद्युत तारा, पथदिवे आणि मिरवणूक मार्गास अडथळा निर्माण करणाऱ्या वृक्षांच्या फांद्या छाटण्याबाबत यावेळी सर्व नगरसेवकांशी चर्चा करण्यात आली. तसेच शहरात विविध ठिकाणी फ्लेक्स लावण्यासाठी जागा निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला, ज्यामागे शहराचे विद्युतीकरण सुरळीत ठेवणे, महापुरुष व देवी-देवतांच्या प्रतिमांची विटंबना टाळणे आणि अपघातांची शक्यता कमी करणे हा उद्देश आहे.

CCTV Camera
Municipal Council Controversy: कोपरगावात राष्ट्रवादीचा नगरपरिषद सर्वसाधारण सभेवर बहिष्कार

शहरातील हॉस्पिटलमधील निघणारा बायोमेडिकल वेस्ट व्हिलेवाट लावण्याची डॉक्टरांची अडचण समजून घेत त्याकरीता इनसिनारेशन प्लांट उभारण्याचा विचार करण्यात आला. त्यामधील डीपीआरमधील आरक्षित क्षेत्र एक एकरवरून दोन एकर करण्याचाही निर्णय घेण्यात आला. नगरपरिषदेच्या नवीन रुग्णवाहिकेसाठी चालक, इंधन दर व देखभाल खर्चाबाबतही चर्चा झाली. शहरातील वाढता प्लास्टिक कचरा लक्षात घेता प्लास्टिक प्लेट, कॅरीबॅग व सिल्वर फॉइल प्लेट यांसारख्या वस्तूंवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

CCTV Camera
Dengue Cases: भालगावात डेंग्यूचे सहा संशयित रुग्ण; घरोघरी तपासणी मोहीम

बैठकीमध्ये 29 महत्त्वपूर्ण निर्णय

यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बंदिस्त नाट्यगृह सुरू करण्यासंदर्भातही सकारात्मक चर्चा झाली. सायलेंस झोन निश्चित करण्यासाठी पोलीस स्टेशनला पत्र देऊन जागा निश्चित करण्याचा निर्णय झाला. या बैठकीमध्ये एकूण 29 महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून, या सर्व निर्णयांचे नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केलेे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news