Rahuri Bypoll Voting: राहुरी पोटनिवडणूक; 56.20% मतदान, 4 मे रोजी मतमोजणी

उन्हाचा मतदानावर परिणाम; सात उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद, वांबोरी-दगडवाडीत मशीन बदल
Rahuri Bypoll Voting
Rahuri Bypoll VotingPudhari
Published on
Updated on

नगर: राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी जवळपास 1 लाख 87 हजार 463 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जवळपास 56.20 टक्के मतदान झाल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. उन्हाच्या तडाख्याचा या मतदानावर परिणाम झाल्याचे दिसले. कडेकोट पोलिस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. दगडवाडी व वांबोरी येथील केंद्रांवरील प्रत्येकी एक मशीन बदलण्यात आले. दरम्यान, राहुरी येथे 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

Rahuri Bypoll Voting
Ashok Kharat: भोंदू अशोक खरात प्रकरणात शिर्डी हॉटेल कनेक्शन; ‘मेरी गोल्ड’वर ईडीचा छापा

भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे, अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांच्यासह सात उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद झाले आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी (दि.23) मतदान झाले. 3 लाख 33 हजार 545 मतदारांसाठी 374 केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी 7 वाजता मतदानास प्रारंभ झाला. तत्पूर्वी प्रत्येक केंद्रावर उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मॉकपोल घेण्यात आले.

Rahuri Bypoll Voting
Municipal Council Controversy: कोपरगावात राष्ट्रवादीचा नगरपरिषद सर्वसाधारण सभेवर बहिष्कार

भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी बुऱ्हाणनगर येथे मतदान केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गोविंद मोकाटे यांनी नगर तालुक्यातील इमामपूर येथे, तर अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांनी राहुरी तालुक्यातील देसवंडी येथे मतदान केले.

सकाळी पहिल्या दोन तासांत 21 हजार 404 मतदान झाले होते. त्यानंतर दोन तासांत 60 हजार 784 मतदान (18 टक्के जास्त) झाले. गुरुवारी तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने दुपारच्या वेळी मतदार मतदानासाठी बाहेर न पडल्याचे दिसून आले. दुपारी तीन वाजता 354 केंद्रांवर 1 लाख 32 हजार 255 मतदारांनी मतदान केल्याचे दिसून आले.

Rahuri Bypoll Voting
Dengue Cases: भालगावात डेंग्यूचे सहा संशयित रुग्ण; घरोघरी तपासणी मोहीम

सायंकाळी पाच वाजेपर्यंत दहा तासांत 50.74 टक्के मतदानाची नोंद झाली होती. शेवटच्या एका तासांत जवळपास 18219 हजार मतदारांनी मतदान केल्याचा अंदाज आहे. मतदारसंघातील 3 लाख 33 हजार 545 मतदारांपैकी जवळपास 1 लाख 87 हजार 463 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सरासरी 56.20 टक्के मतदान झाल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

राहुरी तालुक्यातील वांबोरी व दगडवाडी येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. यामुळे या दोन्ही ठिकाणचे एक एक मतदान यंत्र बदलण्यात आले.

Rahuri Bypoll Voting
Power Cut News: ऐन उन्हाळ्यात विजेचा लंपडाव; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

मतदान प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वच 374 मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात आले होते. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिस नियुक्त करण्यात आले होते. उन्हाचा त्रास मतदारांना होऊ नये यासाठी प्रत्येक केंद्रावर मंडप उभारण्यात आले होते. मतदारांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली होती.

राहुरीत मतमोजणी

राहुरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे. राहुरी येथील लोकनेते रामदास पाटील धुमाळ आर्ट्स, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेजमध्ये मतमोजणी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news