Ahilyanagar Police Cattle Rescue: राहुरी-राशिनमध्ये 11 गोवंशीयांची सुटका; पोलिसांची मोठी कारवाई

कत्तलीसाठी डांबून ठेवलेली जनावरे वाचवली; 2.13 लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघे फरार
Ahilyanagar Police Cattle Rescue
Ahilyanagar Police Cattle RescuePudhari
Published on
Updated on

नगर: स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने जिल्ह्यातील राशिन (ता. कर्जत) व राहुरी येथे कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 11 गोवंशीय जनावरांची सुटका केली. याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, 2 लाख 73 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Ahilyanagar Police Cattle Rescue
Kopargaon Municipal Meeting Decisions: कोपरगाव पालिकेचे 29 निर्णय; जलतलावांवर CCTV, प्लास्टिकवर बंदी

पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या ठिकाणांची व गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या व्यक्तींचर माहिती घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले.

Ahilyanagar Police Cattle Rescue
Rahuri Bypoll Voting: राहुरी पोटनिवडणूक; 56.20% मतदान, 4 मे रोजी मतमोजणी

त्यानुसार कबाडी यांनी उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलिस अंमलदार लक्ष्मण खोकले, सोमनाथ झांबरे, अमोल आजबे, प्रकाश मांडगे, सागर ससाणे, भगवान थोरात, रमिजराजा आत्तार, विशाल तनपुरे, चालक अरुण मोरे यांची दोन पथके तयार करून कारवाईसाठी रवाना केली.

Ahilyanagar Police Cattle Rescue
Ashok Kharat: भोंदू अशोक खरात प्रकरणात शिर्डी हॉटेल कनेक्शन; ‘मेरी गोल्ड’वर ईडीचा छापा

23 एप्रिल 2026 रोजी पथकाने कर्जत व राहुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोवंशीय जनावरांचे कत्तल करणाऱ्यासाठी डांबून ठेवणाऱ्या व वाहतूक करणाऱ्या व्यक्तींची माहिती काढून कारवाई केली. पोलिस पथकाने राशिन येथे छापा घालून 60 हजारांच्या चार गोवंशीय जनावरांची सुटका केली. तर, सोहेल राजू कुरेशी (रा. कुरेशी गल्ली, राशिन ता. कर्जत(फरार) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

Ahilyanagar Police Cattle Rescue
Municipal Council Controversy: कोपरगावात राष्ट्रवादीचा नगरपरिषद सर्वसाधारण सभेवर बहिष्कार

राहुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून 63 हजारांच्या 7 गोवंशीय जनावरांची सुटका करून वाहनांसह एक लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तर, शाहरुख सुलतान कुरेशी (रा. राहुरी(फरार), मुक्तार मुश्ताक कुरेशी (रा. राहुरी ता.राहुरी(फरार) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही कारवाईमध्ये एकूण 2 लाख 13 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी राहुरी व कर्जत पोलिस ठाण्यात स्वतृंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news