Rahuri Truck Accident: राहुरी बसस्थानकासमोर भरधाव मालट्रकचा अपघात; तीन टपऱ्या उद्ध्वस्त

नगर-मनमाड महामार्गावर नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट दुकानांमध्ये घुसला; मोठे नुकसान, जीवितहानी टळली
Rahuri Truck Accident
Rahuri Truck AccidentPudhari
Published on
Updated on

राहुरी: नगर-मनमाड राज्य महामार्गावर आज सकाळी भरधाव मालट्रक थेट राहुरी बसस्थानकासमोरच्या टपऱ्या व दुकानांमध्ये घुसला. क्षणातच आरडाओरडा, धूळ आणि भगदाडाचे दृश्य निर्माण झाले. तीन टपऱ्या अक्षरशः जमीनदोस्त झाल्या. दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. यात सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही.

Rahuri Truck Accident
Pathardi House Robbery: पाथर्डी तालुक्यात मालेवाडी येथे मध्यरात्री दरोडा; साडेआठ तोळे सोन्याची लूट

मालट्रक (जीजे 10 टीएक्स 9244) सकाळी सुमारे 7 वाजता राहुरी फॅक्टरीकडून नगरच्या दिशेने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले. अवघ्या काही सेकंदांत ट्रक थेट बसस्थानकासमोरच्या टपऱ्यांवर आदळला.

Rahuri Truck Accident
Ahilyanagar Minor Forced Marriage Assault Case: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गर्भपातासाठी दबाव

सुदैवाने सकाळची वेळ असल्याने दुकाने उघडली नव्हती. अन्यथा मोठी जीवितहानी अटळ होती, अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नवले, संदीप ठाणगे, पोलिस नाईक जयदीप बडे यांच्यासह पोलिस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

Rahuri Truck Accident
Nashik Pune Railway Route: नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग बदलू नका; चक्काजामचा इशारा

अपघातग्रस्त ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघातामुळे नागरिकांनी पुन्हा एकदा नगर-मनमाड महामार्गाची दुरवस्था, अपूर्ण कामे आणि काही ठिकाणची एकेरी वाहतूक याविषयी संताप व्यक्त केला.

Rahuri Truck Accident
Nevasa Nagar Panchayat Election Result: नेवासा नगरपंचायतीत बदलाचा कौल, शिंदे सेनेचा पहिलाच नगराध्यक्ष

आणखी किती अपघात झाल्यावर प्रशासन जागे होणार? असा सवाल प्रवासी व व्यापारी वर्गातून उपस्थित होत असून, महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे व धोकादायक ठिकाणी बॅरिकेडिंग करावे, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news