Petrol Diesel Sale Ban: पेट्रोल-डिझेल उघड्यावर विक्रीस बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा कडक आदेश

बाटली-कॅनमध्ये इंधन देण्यास मनाई; उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा इशारा
Petrol Diesel Sale Ban
Petrol Diesel Sale BanPudhari
Published on
Updated on

नगर : पेट्रोल-डिझेल केवळ वाहनांच्या इंधन टाकीतच भरावेत. कोणत्याही परिस्थितीत खुल्या स्वरूपात म्हणजेच प्लास्टिक बाटली, कॅन, डबा किंवा इतर कोणत्याही भांड्यात विक्री करू नये, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जारी केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित पेट्रोलपंप मालक व व्यवस्थापकावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Petrol Diesel Sale Ban
Namo Kisan Yojana: नमो किसान योजनेचा आठवा हप्ता जमा; जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा

समाजमाध्यमांवर पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याबाबत पसरत असलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी गुरुवारी (दि.26) महत्त्वपूर्ण आदेश जारी केले आहेत. पेट्रोलियम नियम 2002 मधील तरतुदींचा आधार घेत काढण्यात आलेले हे आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत. या नव्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात उघड्यावर म्हणजे कॅन, बाटली किंवा डब्यात पेट्रोल आणि डिझेल देण्यावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंप चालकांनी पेट्रोल आणि डिझेल केवळ वाहनांच्या इंधन टाकीतच भरावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Petrol Diesel Sale Ban
Rahuri Minor Girl Assault: लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार; राहुरीतील धक्कादायक घटना

पेट्रोलपंप परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवणे आणि इंधन विक्रीच्या नोंदी नियमितपणे ठेवणे बंधनकारक केले आहे. या आदेशाचे काटेकोर पालन करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित पेट्रोलपंप मालक आणि व्यवस्थापकांची असणार आहे. जे कोणी या नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर पेट्रोलियम नियम 2002, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदींनुसार दंडात्मक आणि फौजदारी स्वरूपाची कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Petrol Diesel Sale Ban
Rahuri Robbery: बेशुद्ध शिक्षकाला मदतीऐवजी लुटले; राहुरीत अमानुष प्रकार उघड

पुरेसा साठा राहील याची दक्षता घ्या

जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर इंधनाचा पुरेसा साठा राहील याची दक्षता घेण्याचे निर्देशही जिल्हा प्रशासनाने सर्व पेट्रोलियम कंपन्यांच्या व्यवस्थापकांना दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news