

राहुरी : अपघातात जखमी होऊन रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या शिक्षकाला मदत करण्याऐवजी लुटण्याचा अमानुष प्रकार राहुरी फॅक्टरी परिसरात समोर आला. या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे.
राहुरी तालुक्यातील केसापूर येथील दत्तात्रय तुकाराम हे 23 मार्च रोजी सायंकाळी देवळाली प्रवरा येथून राहुरी फॅक्टरीकडे दुचाकीवरून जात होते. श्रीरामपूर रोडवरील देवळाली कॅम्प परिसरात अचानक दुचाकी घसरल्याने ते खाली पडले. गंभीर मार लागल्याने ते रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत पडले. मदतीचा हात देण्याऐवजी माणुसकीला
काळीमा फासणारी कृत्य वाटसरुने केले. शिंदे यांच्या असहाय अवस्थेचा गैरफायदा घेत दुचाकी, मोबाईल, दीड हजार रुपयांची रोकड व महत्त्वाची कागदपत्रे लंपास केली. शुद्धीवर आल्यानंतर शिंदे यांना घडलेल्या धक्कादायक प्रकाराची जाणीव झाली.
शिंदे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. पोलिसांत अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.