Newasa Paiskhamb Ekadashi: षट्तिला एकादशीला नेवासा पैस खांब मंदिरात भाविकांचा महासागर

मकरसंक्रांतीच्या दिवशी सुमारे एक लाख भाविकांनी घेतले माऊलींचे दर्शन
Newasa Paiskhamb Ekadashi
Newasa Paiskhamb EkadashiPudhari
Published on
Updated on

नेवासा: षट्तिला एकादशीनिमित्त तीर्थक्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज पैस खांब मंदिरामध्ये मकरसंक्रांतीच्या दिवशी सुमारे एक लाख भाविकांनी माऊलींचे मूर्तीमंत रूप असलेल्या पैस खांबाचे दर्शन घेतले. यावेळी शेकडो दिंड्यांनी येथे ज्ञानोबा माऊली तुकारामअसा गजर करत हजेरी लावली होती. आलेल्या दिंडयांचे संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान विश्वस्त वेदांताचार्य देवीदास महाराज म्हस्के यांनी स्वागत केले.

Newasa Paiskhamb Ekadashi
Akole Cattle Transport Case: अकोलेत 26 गोवंशाची क्रूर वाहतूक उघडकीस

पहाटे संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख देवीदास महाराज म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षभर माऊलींच्या प्रांगणात रांगोळी काढणाऱ्या सुरेखा वाघ व अभिजित वाघ या यजमानांच्या हस्ते माऊलींच्या पैस खांबास अभिषेक घालण्यात आला. यावेळी झालेल्या पहाटेच्या पूजेप्रसंगी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Newasa Paiskhamb Ekadashi
Kopargaon Municipal Development: कोपरगावच्या विकासासाठी इंदौर मॉडेलचा अभ्यास करा: बिपीनराव कोल्हे

षट्तिला एकादशीला दूरवरून दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे संत ज्ञानेश्वर महाराज पैसखांब मंदिराच्या विश्वस्त मंडळींनी स्वागत केले. यावेळी खेड्यापाडयांतून पायी आलेल्या व दिंडीतील चालकांचा संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे म्हस्के महाराज म्हस्के, विश्वस्त कृष्णा पिसोटे, कैलास जाधव यांच्या हस्ते श्रीफळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला.

Newasa Paiskhamb Ekadashi
Ahilyanagar Headmaster Suspension: 34 वर्षांची स्वच्छ सेवा; तरीही मुख्याध्यापक निलंबनाच्या भोवऱ्यात

एकादशीचे औचित्य साधून माऊलींच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मंदिरातील विठ्ठल-रुख्मिणी, संत ज्ञानेश्वर माऊली पैस खांब, भगवान दत्तात्रय, करविरेश्वर, वै. बन्सी महाराज तांबे समाधी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. एकादशी निमित्त संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर परिसर गर्दीने गजबजून गेला होता.

Newasa Paiskhamb Ekadashi
Ahilyanagar Municipal Election Violence: अहिल्यानगर महापालिका निवडणूक: भाजप-सेना समर्थकांमध्ये सशस्त्र हाणामारी

मंदिर परिसरात विविध दुकाने उभारण्यात आल्याने यात्रेचे स्वरूप परिसराला प्राप्त झाले होते. रात्री देवीदास महाराज म्हस्के यांचे कीर्तन झाले. कीर्तनाला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.कीर्तनानंतर उपस्थित भाविकांना शाबुदाना खिचडीचे वाटप करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news