Nevasa Sugarcane Price Protest: ऊसदर वाढीसाठी नेवासा फाट्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको; आमदार लंघे रस्त्यावर

दोन तास महामार्ग रोखला; साखर कारखानदारांच्या एकजुटीवर शेतकरी संघटनेचा सवाल, थकीत ऊसबिल व्याजासह देण्याची मागणी
Nevasa Sugarcane Price Protest
Nevasa Sugarcane Price ProtestPudhari
Published on: 
Updated on: 

नेवासा: जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व साखर सम्राट एकत्र येऊन हातात हात घालू शकतात, मग घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव देण्यासाठी त्यांना एकत्र का येता येत नाही? असा संतप्त सवाल विचारत शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी अहिल्यानगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी तब्बल दोन तास महामार्ग रोखून धरत चक्का जाम केला.

Nevasa Sugarcane Price Protest
Rahuri Minor Girls Missing: राहुरी तालुक्यात तीन अल्पवयीन मुली बेपत्ता; पालकांमध्ये भीतीचे वातावरण

या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी भररस्त्यात ठिय्या मांडून भजन करीत साखर सम्राटांचा जाहीर निषेध नोंदवला. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील म्हणाले, “मी केवळ एका तालुक्‍याचा आमदार म्हणून नव्हे, तर एक शेतकरी पुत्र म्हणून आज तुमच्या सोबत बसलो आहे. ऊस पिकवणे शेतकऱ्यांच्या हातात असले तरी त्याला योग्य भाव मिळवणे बळीराजाच्या हातात उरलेले नाही. शेतकरी सध्या भीषण दुष्काळाला तोंड देत असताना उसाला योग्य दर मिळणे अत्यावश्‍यक आहे. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये वर्षानुवर्षे कारखानदारांकडे अडकून पडले आहेत. ही थकीत रक्‍कम व्याजासह तातडीने परत करावी, हीच माझी प्रमुख मागणी आहे. आमदार लंघे पाटील यांनी आंदोलनाला पाठिंबा देताच उपस्थितांनी त्यांचे जोरदार स्वागत केले

Nevasa Sugarcane Price Protest
Rahuri Sugarcane Farmers Protest: ऊसदरासाठी शेतकरी आक्रमक; नगर-मनमाड महामार्गावर नऊ तास ठिय्या

आंदोलनात सहभागी विविध नेत्यांनी साखर कारखानदारांच्या धोरणांवर कडाडून टीका केली. कारखानदारांवर करोडो कोटींचे कर्ज असल्याने त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध केली; मात्र रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उसाचा भाव जाहीर करताना हेच कारखानदार मूग गिळून गप्प बसतात, असा आरोप वक्त्यांनी केला. ऊस तोडणी झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा कायद्याने बंधनकारक असतानाही त्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले.

Nevasa Sugarcane Price Protest
Ahilyanagar Firecracker Assault: फटाके फोडण्यास विरोध केल्याने अल्पवयीन मुलासह कुटुंबीयांना मारहाण

तसेच सर्व कारखान्यांच्या वजन काट्यांची अधिकृत व निष्पक्ष तपासणी करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी लावून धरण्यात आली. या प्रसंगी शेतकरी संघटनेचे ॲड. अजित काळे, अंकुश काळे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा, ऋषिकेश शेटे , काँग्रेसचे संभाजी माळवदे, पुरूषोत्तम सर्जे, जिल्हाध्यक्ष राजू आघाव, प्रताप चिंधे, गणेश चौगुले आदिंनी मनोगत व्यक्त करून साखर कारखानदारीवर सडकून टीका केली.

यावेळी नगरसेवक प्रवीण सरोदे, अंकूश म्हस्के, कृष्णा परदेशी, शिवसेनेचे भाऊसाहेब वाघ, बाळासाहेब पवार, विजय गायकवाड , माजी सभापती देवीदास साळुंके, मनोज पारखे, प्रदीप ढोकणे, ॲड. विश्वास काळे, नरेंद्र काळे, राजू मते, बाळासाहेब क्षीरसागर, गणेश झगरे, नितिन जगताप, आदिनाथ पटारे, सतीश कर्डीले , भाऊसाहेब काळे व शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

Nevasa Sugarcane Price Protest
Tisgaon Traffic Jam: दिवाळीच्या गर्दीने तिसगावमध्ये वाहतुकीचा खोळंबा; तीन तास महामार्ग ठप्प

आंदोलनामुळे महामार्गाच्या दुतर्फा सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नेवाशाचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे व सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीत केली.

सत्तेत असूनही आ. लंघे थेट रस्त्यावर!

नेवासा फाट्यावर ऊसदर वाढीसाठी मंगळवारी दोन तास रास्ता रोको आंदोलन झाले. या आंदोलनाचे प्रमुख आकर्षण ठरले ते आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांची प्रत्यक्ष उपस्थिती. सत्तेत सहभागी असूनही ते शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी थेट आंदोलनात उतरले आणि रखरखत्या उन्हात रस्त्यावर मांडी घालून बसले होते . या ठिकाणी आमदाराअगोदर आपण शेतकरी असल्याचे सांगून उपस्थितांच्या टाळ्या घेतल्या. या आंदोलनात आ. लंघेंची उपस्थिती लक्षणीय ठरली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.