Tisgaon Traffic Jam: दिवाळीच्या गर्दीने तिसगावमध्ये वाहतुकीचा खोळंबा; तीन तास महामार्ग ठप्प

वृद्धेश्वर चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा; पोलीस निरीक्षक नितीन कंदारे रस्त्यावर, दोन रुग्णवाहिकांना दिली वाट
Tisgaon Traffic Jam
Tisgaon Traffic JamPudhari
Published on: 
Updated on: 

करंजी: पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे दिवाळीनिमित्त कल्याण-निर्मळ या राष्ट्रीय महामार्गावर चाकरमान्यांची अफाट गर्दी झाल्याने तिसगावच्या वृद्धेश्वर चौकासह शेवगाव रोड चौकात सुमारे तीन तास वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या रस्त्याच्या दुतर्फा बाजूने लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या.

Tisgaon Traffic Jam
Shrirampur Car Fire: श्रीरामपुरात दोन गटांत राडा; दगडफेकीनंतर कार पेटवली

पाथर्डीचे पोलिस निरीक्षक नितीन कंदारे स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करत होते. प्रत्येक वाहनचालकाला पुढे जाण्याची मोठी घाई असल्याने रस्त्याच्या विरुद्ध बाजूनेही अनेक वाहनचालकांनी प्रवास करण्याचा प्रयत्न केल्याने वाहतूक कोंडी सुरळीत करताना पोलीस प्रशासनालाही मोठा ताण सहन करावा लागला.

Tisgaon Traffic Jam
Kolhar Warehouse Fire: फटाक्यामुळे भांड्यांच्या गोदामाला भीषण आग; लाखोंचे साहित्य जळून खाक

तिसगाव येथील वृद्धेश्वर चौकात नगर, पाथर्डीकडे जाणाऱ्या वाहनांसह मिरीमार्गे नेवासा, राहुरी, शिर्डी, शिंगणापूरकडे जाणाऱ्या वाहनचालकांची संख्याही मोठी असल्याने या चौकात बराच वेळ वाहतूक कोंडी झाली. पोलिस प्रशासनासह स्थानिक तरुणांनीही वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी मदत केली. रविवारी दीपावलीचा सण पार पडला असला, तरी मंगळवारचा पाडवा, बुधवारी भाऊबीज असल्याने महामार्गावर चाकरमान्यांची मोठी गर्दी पहायला मिळाली. एसटी बसच्या तुलनेत खासगी वाहनाद्वारे प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच मोठी असल्याने नगर-पाथर्डी- शेवगाव रस्ता अक्षरशः वाहनांच्या वर्दळीने हाऊसफुल्ल झाला होता.

Tisgaon Traffic Jam
Shevgaon School Teacher Sleeping: शाळेच्या वेळेतच शिक्षक झोपेत! शेवगाव तालुक्यातील ढोरसडे प्राथमिक शाळेतील प्रकाराने खळबळ

तिसगाव येथील वाहतूक कोंडीत दोन रुग्णवाहिकाही अडकल्या होत्या. परंतु पोलिस निरीक्षक नितीन कंदारे, उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर यांनी स्वतः रस्त्यावर उतरून या दोन्ही रुग्णवाहिकांना वेळीच रस्ता मोकळा करून दिला. पोलिस प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे रुग्णवाहिकेतील रुग्णही वेळेत उपचारासाठी रुग्णालयापर्यंत पोहोचले.

पाथर्डी पोलिस स्टेशनला नव्यानेच हजर झालेले पोलिस निरीक्षक नितीन कंदारे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्यासाठी दाखवलेली तत्परता पाहून स्थानिक तरुणांसह काही प्रवाशांनीही समाधान व्यक्त केले.

Tisgaon Traffic Jam
Nagar Livestock Fodder Crisis: नगर तालुक्यात दुष्काळाचे पशुधनावर संकट! अडीच लाख जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर

पोलिस प्रशासनाला वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्थानिक तरुणांनी मदत केल्याने तीन तासानंतर तिसगाव येथील वाहतूक कोंडी फुटली आणि महामार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत सुरू झाला. कंदारे यांच्यासह उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर, नितीन दराडे, अमोल घुगे, रवींद्र चव्हाण यांच्यासह भैय्या बोरुडे, अंबादास शिंदे, फिरोज पठाण, सुगन शिंदे, समर्थ मांजरे, पापाभाई तांबोळी, देवा कुलकर्णी, सतीश ससाणे दीपक गरुड, अजय खंडागळे, उदय लवांडे, गणेश भोसले या तरुणांनी वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी पोलिस प्रशासनाला मदत केली.

दिवाळीचा उत्सव सुरू असल्यामुळे महामार्गावर चाकरमान्यांची मोठी गर्दी आहे. तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक व ट्रॅक्टरची संख्याही अधिक असल्याने नगर, पाथर्डी, शेवगाव रस्त्यावर गेल्या दोन दिवसांपासून प्रवाशांची संख्या मोठी असल्याने तिसगावसारख्या काही ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. मात्र, तिसगाव, पाथर्डी, निवडुंगे, करंजी अशा महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिस सतर्क आहेत.

नितीन कंदारे, पोलिस निरीक्षक, पाथर्डी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.