Ahilyanagar Firecracker Assault: फटाके फोडण्यास विरोध केल्याने अल्पवयीन मुलासह कुटुंबीयांना मारहाण

अहिल्यानगरच्या फुलसौंदर चौकातील घटना; पाच जणांसह अन्य तरुणांवर गुन्हा, दोघांना पोलिस कोठडी
Crime News
Crime NewsPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: कोतवाली पोलिस ठाण्यापासून हकेच्या अंतरावर असणाऱ्या पंचपीर चावडी परिसरातील फुलसौंदर चौकात फटाके फोडण्याच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलासह त्याच्या कुटुंबियांना मारहाण करण्यात आली. ही घटना ८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात पाच जणांसह अन्य काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Tisgaon Traffic Jam: दिवाळीच्या गर्दीने तिसगावमध्ये वाहतुकीचा खोळंबा; तीन तास महामार्ग ठप्प

मोईनुद्दीन रझाक बागवान, समीर युसूफ बागवान (रा. आलमगीर), ताहेर मजिदउल्ला खान (रा. माळीवाडा), आफन जावेद शेख (रा. पिंजारगल्ली), अमन राजू बागवान यांच्यासह अन्य २ ते ३ अनोळखी तरुणांचा संशयित आरोपींमध्ये समावेश आहे. मोईनुद्दीन बागवान, जरक अब्दुलाखान यांना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Crime News
Shrirampur Car Fire: श्रीरामपुरात दोन गटांत राडा; दगडफेकीनंतर कार पेटवली

याबाबत रेणुका गणेश शेळके रा. मल्हार चौक, स्टेशन रोड, अहिल्यानगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. ८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता फिर्यादी यांचा लहान मुलगा विराज हा फुलसौंदर चौकातील जगदंबा भोजनालयसमोर गप्पा मारत बसला होता. यादरम्यान, काही तरुण त्या ठिकाणी येऊन घरासमोर फटाके वाजवत आणि रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांच्या अंगावर फटाके फेकत होते.

Crime News
Kolhar Warehouse Fire: फटाक्यामुळे भांड्यांच्या गोदामाला भीषण आग; लाखोंचे साहित्य जळून खाक

विराजने त्यांना घरासमोर फटाके फोडू नका व फटाके अंगावर फेकू नका असे म्हणाला असता संशयितांनी वाद घातला. त्यानंतर संबंधित तरुणांनी आणखी मुलांना बोलावून घेत दगडफेक व धिंगाणा घातला. वाद सोडवण्यासाठी गेलेल्या फिर्यादी व नातेवाईकांना देखील संशयितांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. संशयित आरोपींनी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Crime News
Shevgaon School Teacher Sleeping: शाळेच्या वेळेतच शिक्षक झोपेत! शेवगाव तालुक्यातील ढोरसडे प्राथमिक शाळेतील प्रकाराने खळबळ

कोतवाली पोलिसांनी तत्काळ दोघांना अटक केली असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक कुणाल सपकाळ करत आहेत. दरम्यान, ऐन दिवसाळीच्या दिवशी ही घटना घडली. घटनेची माहिती समजताच आमदार संग्राम जगताप यांनी समर्थकांसह घटनास्थळी धाव घेतली होती. त्यामुळे पोलिस ठाण्यात मोठा जमाव जमला होता. तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.