Rahuri Minor Girls Missing: राहुरी तालुक्यात तीन अल्पवयीन मुली बेपत्ता; पालकांमध्ये भीतीचे वातावरण

निंभेरे, टाकळीमिया आणि वांबोरीतील घटना; मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
Kidnapping News
Kidnapping NewsPudhari
Published on: 
Updated on: 

राहुरी: राहुरी तालुक्यात निंभेरे, टाकळीमिया आणि वांबोरी परिसरात अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना उघडकीस आल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. घरात कुटुंबीयांसोबत झोपलेल्या, नातेवाइकांच्या घरी राहण्यासाठी आलेल्या, तसेच महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुली बेपत्ता होत असल्याने मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुलींना फूस लावून पळवून नेण्याच्या संशयातून अपहरणाचे गुन्हे दाखल होत असताना अशा घटनांना आळा घालणार कोण, असा संतप्त सवाल पालक आणि नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

Kidnapping News
Rahuri Sugarcane Farmers Protest: ऊसदरासाठी शेतकरी आक्रमक; नगर-मनमाड महामार्गावर नऊ तास ठिय्या

निंभेरे परिसरात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी रात्री कुटुंबीयांसोबत जेवण करून घरात झोपली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ती घरातून बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आले. अज्ञात तरुणाने मुलीला पळवून नेल्याची फिर्याद तिच्या आईने राहुरी पोलिसांत दिली.

Kidnapping News
Ahilyanagar Firecracker Assault: फटाके फोडण्यास विरोध केल्याने अल्पवयीन मुलासह कुटुंबीयांना मारहाण

टाकळीमिया येथे १६ वर्षे १० महिन्यांची अल्पवयीन मुलगी पहाटेच्या सुमारास बेपत्ता झाली. ही मुलगी सुमारे पंधरा दिवसांपूर्वी आपल्या बहिणीकडे राहण्यासाठी आली होती. दि.२ नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजता बहिणीला शेजारी झोपलेली मुलगी दिसून आली नाही. अखेर बहिणीने पोलिसांत धाव घेत अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला. वांबोरी परिसरात ११ वीच्या वर्गात शिक्षण घेणारी १६ वर्षीय महाविद्यालयीन तरुणी घरातून बेपत्ता झाली. तिच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे.

Kidnapping News
Tisgaon Traffic Jam: दिवाळीच्या गर्दीने तिसगावमध्ये वाहतुकीचा खोळंबा; तीन तास महामार्ग ठप्प

या तिन्ही घटनांमुळे राहुरी तालुक्यातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलींना शाळा-महाविद्यालयात पाठवायचे, घराबाहेर कामानिमित्त जाऊ द्यायचे की नाही, असा प्रश्न पालकांना सतावत आहे. अल्पवयीन मुलींच्या बाबतीत घडणाऱ्या या घटना केवळ संबंधित कुटुंबांपुरत्या मर्यादित नसून संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेशी निगडित आहेत.

Kidnapping News
Shrirampur Car Fire: श्रीरामपुरात दोन गटांत राडा; दगडफेकीनंतर कार पेटवली

अपहरणानंतरच जाग येणार का?

पोलिस प्रशासनाने विशेष पथके तैनात करून तपासाला गती द्यावी, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासावे, संशयितांची माहिती संकलित करावी आणि प्रत्येक प्रकरणाचा गांभीर्याने पाठपुरावा करावा. मुलींच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती, शाळा-महाविद्यालय परिसरात दक्षता आणि नागरिकांचा सहभाग वाढविणेही आवश्यक आहे. पालकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी पोलीस कारवाईची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.