Nevasa Sub Registrar Scam: नेवासा दुय्यम निबंधक कार्यालयात बोगस दस्त नोंदणीचे आरोप

तक्रारी करूनही कारवाई नाही; वरिष्ठांचे किंवा राजकीय ‘अभय’ असल्याचा नागरिकांचा संशय
Sub Registrar
Sub RegistrarPudhari
Published on
Updated on

नेवासा: नेवासा दुय्यम निबंधक कार्यालयात कायदेशीर तरतुदींना हरताळ फासत बोगस दस्त नोंदणीचे अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. या संदर्भात पुराव्यांसह नोंदणी महानिरीक्षक, पुणे आणि जिल्हा सहनिबंधक यांच्याकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नाही. या निष्क्रियतेमुळे आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे.

Sub Registrar
Pune Nashik Railway Project: पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प वादात; मार्ग बदलामुळे आंदोलन

संबंधित वादग्रस्त दुय्यम निबंधकाला वरिष्ठांचे की राजकीय नक्की कोणाचे ‌‘अभय‌’ मिळत आहे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. तक्रारदारांच्या दाव्यानुसार ज्या मालमत्तेच्या सिटी सर्व्हे उतारा आणि ग्रामपंचायत उताऱ्यामध्ये मोठी तफावत आहे, अशा मिळकतीचा दस्त केवळ ‌‘अर्थ‌’पूर्ण हितसंबंधांतून नोंदविण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे मालमत्तेबाबत न्यायालयात वाद प्रलंबित असताना आणि मालकीबाबत अंतिम कायदेशीर स्पष्टता नसतानाही ही नोंदणी उरकण्यात आली. हा थेट ‌‘नोंदणी अधिनियमाचा‌’ भंग आहे.

Sub Registrar
Ahilyanagar Gas Shortage: अहिल्यानगरात गॅस तुटवडा; उद्योगांसाठी तातडीच्या उपाययोजना

त्यामुळे शासनाचा महसूल बुडवून खासगी व्यक्तींना फायदा करून दिल्याचा आरोप होत आहे. सर्वात संतापजनक बाब म्हणजे, ज्यांच्या विरोधात गंभीर तक्रारी आहेत, तेच वादग्रस्त दुय्यम निबंधक काही दिवस रजेवर जाऊन पुन्हा नेवाशातच ठाण मांडून बसले आहेत.

Sub Registrar
Shrigonda Extortion Case: श्रीगोंद्यात खंडणीसाठी महिला विक्रेत्यावर हल्ला; गावबंदचा निर्णय

वरिष्ठांकडे तक्रार केली तरीही माझं काहीच होणार नाही, असा चुकीचा संदेश यातून जात असल्याची भावना तक्रारदारांमध्ये आहे. या प्रकारामुळे सामान्य नागरिकांचे खच्चीकरण होत असून भ्रष्ट ‌‘वसुली पॅटर्न‌’ला प्रशासनाचीच मूक संमती आहे की काय, अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे.

Sub Registrar
Pathardi Theft: पाथर्डीत घरफोड्यांची मालिका; चार ठिकाणी चोरी, CCTV मध्ये चोरटे कैद

‌‘त्या‌’ साखळीचा होणार भांडाफोड?

नेवासा दुय्यम निबंधक कार्यालयातील या बोगस कारभाराकडे वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जिल्हा व राज्य स्तरावर तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याने आता हे प्रकरण थेट राज्याच्या महसूल मंत्री व मंत्रालयापर्यंत नेण्याचा पवित्रा तक्रारदारांनी घेतला आहे. नियमबाह्य नोंदणी रद्द करून संबंधित दुय्यम निबंधकावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news