Shrigonda Extortion Case: श्रीगोंद्यात खंडणीसाठी महिला विक्रेत्यावर हल्ला; गावबंदचा निर्णय

50 हजारांची मागणी नाकारल्याने मारहाण; आरोपींवर कारवाईची नागरिकांची मागणी
Shrigonda Extortion Case
Shrigonda Extortion CasePudhari
Published on
Updated on

श्रीगोंदा: आईस्क्रीमची गाडी लावण्यासाठी महिन्याला पन्नास हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या तरुणाने आईस्क्रीम विक्रेत्या महिलेला लोखंडी गज आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि 21) रात्री श्रीगोंदा शहरातील पारगाव रस्त्यावरील महात्मा फुले उद्यानासमोर घडली.

Shrigonda Extortion Case
Pathardi Theft: पाथर्डीत घरफोड्यांची मालिका; चार ठिकाणी चोरी, CCTV मध्ये चोरटे कैद

मारहाणीचा निषेध करीत महात्मा फुले उद्यानाजवळ राहणाऱ्या विशिष्ट समाजातील लोकांना तिथून बाहेर काढा. सामान्य लोकांना त्रास देणाऱ्या या लोकांवर गुन्हे दाखल करून कारवाई व्हावी, या मागणीसाठी येत्या मंगळवारी (दि. 24) गावबंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. घटनेबाबत पूनम दिनेश शिंदे यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मारहाण आणि खंडणी मागणाऱ्या बाहुल्या गुलाब काळे, त्याची आई संगीता काळे, पत्नी व दोन अनोळखी महिला अशा पाचजणांविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Shrigonda Extortion Case
Ashok Kharat: शिर्डीत भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; पेन ड्राईव्हसाठी दबावाचा कट

रमजान ईदनिमित्त फिर्यादी शिंदे यांचे पती शेख महंमद महाराज मंदिरात दर्शनासाठी गेले होते. तेव्हा त्यांच्या पत्नी पूनम शिंदे या भरकादेवी आईस्क्रीमच्या दुकानावर होत्या. त्या एकट्या असल्याचे पाहून अंगातील कपडे काढून हातात लोखंडी गज घेऊन बाहुल्या गुलाब काळे तेथे आला. त्याच्या मागे त्याची आई, पत्नी आणि इतर दोन अनोळखी महिला आल्या. ‌‘तुझी भरकादेवी आईस्क्रीमचे दुकान लावायचे असेल, तर आम्हाला पन्नास हजार रुपये महिन्याला द्यावे लागतील.

Shrigonda Extortion Case
Dahiwal Saraf Gold: 48 वर्षांची परंपरा आणि विश्वासाची सुवर्ण पेढी सोने चांदीचे व्यापारी दहिवाळ सराफ खरवंडीकर

ही जागा माझ्या ताब्यात आहे, असे सांगत त्याने पूनम शिंदे यांना धमकावले. त्यावर शिंदे यांनी ही जागा श्रीगोंदा नगरपरिषदेची असल्याचे सांगितले. त्याचा राग आल्यामुळे बाहुल्या काळे याने शिंदे यांना लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. त्यानंतर बाहुल्याची आई, पत्नी आणि दोन महिलांनी त्यांना लाथाबुक्क्‌‍यानी मारहाण केली. शिंदे यांनी आरडा ओरडा केल्यानंतर नागरिकांनी शिंदे यांची सुटका केली. आरोपीनी तू आम्हाला पन्नास हजार रुपये दिले नाही, तर आम्ही इथं दुकान लावून देणार नाही. जीवे मारण्याचीही धमकी दिली.

Shrigonda Extortion Case
Wambori Chari Irrigation: वांबोरी चारीचे पाणी रखडले; पाथर्डीत रब्बी पिके सुकण्याच्या मार्गावर

रात्री उशिरा मोठा जमाव पोलिस ठाण्याबाहेर जमला होता. आरोपीना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. मारहाणीच्या निषेधार्थ गावबंद ठेवण्यासाठी महंमद महाराज मंदिरात बैठक घेण्यात आली. मारहाणीचा निषेध करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news