Pathardi Theft: पाथर्डीत घरफोड्यांची मालिका; चार ठिकाणी चोरी, CCTV मध्ये चोरटे कैद

एडके कॉलनी आणि कसबा भागात दागिने व रोकड लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Pathardi Theft
Pathardi TheftPudhari
Published on
Updated on

पाथर्डी: शहरात शनिवारी (दि. 21) रात्री चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत चार ठिकाणी घरफोड्या केल्या. एडके कॉलनी आणि कसबा परिसरात झालेल्या या चोरीच्या मालिकेमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Pathardi Theft
Ashok Kharat: शिर्डीत भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; पेन ड्राईव्हसाठी दबावाचा कट

एडके कॉलनी परिसरात शिक्षक युवराज सीताराम वायळ यांच्या घरासह आणखी दोन ते तीन ठिकाणी चोरट्यांनी घरफोड्या केल्या. वायळ कुटुंबासह गावी गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटांची उचकापाचक करून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Pathardi Theft
Dahiwal Saraf Gold: 48 वर्षांची परंपरा आणि विश्वासाची सुवर्ण पेढी सोने चांदीचे व्यापारी दहिवाळ सराफ खरवंडीकर

मनी मंगळसूत्र (20 ग्रॅम), मिनी गंठन (5 ग्रॅम), चांदीची चेन आणि 8 हजार रोकड असा मुद्देमाल शिक्षक वायळ यांच्या घरातून चोरट्यांनी लंपास केला. ही घटना 17 ते 21 मार्चदरम्यान घडल्याचे स्पष्ट झाले आहे.

Pathardi Theft
Wambori Chari Irrigation: वांबोरी चारीचे पाणी रखडले; पाथर्डीत रब्बी पिके सुकण्याच्या मार्गावर

शेजारी अजय सुसलादे यांनी घराचे तुटलेले कुलूप पाहून वायळ यांना माहिती दिल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, शेजारी राहणाऱ्या भारती कचरू ढाणके यांच्या घरातही चोरी झाल्याचे समोर आले. कसबा परिसरातील ब्राह्मण गल्ली येथे राहणारे शाहू फरताळे यांचे घरही चोरट्यांनी फोडले.

Pathardi Theft
Sangamner Hailstorm Crop: संगमनेरात गारपिटीचा तडाखा; 125 हेक्टरवरील पिकांचे नुकसान

या घटनेतील गंभीर बाब म्हणजे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, त्यांनी तोंडाला रुमाल बांधलेले व पाठीवर बॅग लटकवलेली स्पष्टपणे दिसत आहे. एका चोरट्याने कुत्रा भुंकू नये म्हणून त्याच्यावर दगड फेकल्याचेही दृश्य कॅमेऱ्यात टिपले गेले आहे. तसेच एका चोरट्याच्या हातात शस्त्र असल्याचेही दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news