Bhausaheb Wakchaure: वाय प्लस सुरक्षेत शिर्डीत दाखल झाले खा. भाऊसाहेब वाकचौरे; ठाकरे गटाच्या आक्रमक भूमिकेमुळे कडेकोट बंदोबस्त

शिवसैनिकांवर पोलिसांची नजर; शिर्डी-कोपरगावात प्रतिबंधात्मक कारवाई, राजकीय वातावरण तापले
Bhausaheb Wakchaure
Bhausaheb WakchaurePudhari
Published on
Updated on

शिर्डी: ठाकरे गटाला सोडून शिवसेनेत दाखल झालेले खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे काल वाय प्लस सुरक्षा घेऊन शिर्डीत पोहचले. ठाकरे गटांचा आक्रमक पावित्रात पाहता कोपरगाव आणि शिर्डीच्या शिवसैनिकांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले होते. त्यामुळे कोणतीही अनूचित घटना घडली नसली तरीही खा. वाकचौरे यांच्यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त दिसला. शिवाय निवासस्थानाभोवतीही पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे.

Bhausaheb Wakchaure
Ahilyanagar Industrial Project: अहिल्यानगरच्या हरेगाव मळ्यात ४२०० एकर जागेवर संरक्षण व ऊर्जा प्रकल्प; जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे शिर्डी, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा, अकोले, राहाता तालुक्यातून ठाकरे सैनिक संतप्त दिसला. निदर्शने, पुतळे दहन यासह शिर्डीत पाय ठेऊ देणार नाही, तसेच ‘तुडवातुडवी’चीही भाषा वापरली जात होती. त्यामुळे खा.वाकचौरे हे शिर्डीत आल्यानंतर तणाव निर्माण होऊ शकतो, असा पोलिसांना संशय होता.

Bhausaheb Wakchaure
PM Kisan Samman Nidhi: पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता जमा; जिल्ह्यातील 5.66 लाख शेतकऱ्यांना 111 कोटींचा लाभ

खा. वाकचौरे हे काल मंगळवारी शिर्डीत येणार असल्याने सकाळीच अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व उपाधीक्षक अमोल भारती यांच्या सुचनांनुसार कोपरगाव तसेच शिर्डी पोलिस शिवसैनिकांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन होते. त्यातच, उद्धव ठाकरे हे दि. 29 रोजी शिर्डीत येणार असल्याने त्या तयारीसाठी जिल्हाप्रमुख सचिन कोते यांनी कालच मंगळवारी गेस्ट हाऊसवर पूर्वनियोजित बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी निघालेल्या शिवसैनिकांना स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले होते. कोपरगावातूनही भारत मोरे, संगमनेरातून अमर कतारी, श्रीरामपुरातून लखन जाधव, राहात्यातून नाना बावके यासह शिवसैनिकांना पोलिसांनी पोलिस ठाण्यात थांबवून ठेवले होते. शिर्डीतही सचिन कोते आणि संजय शिंदे यांना सहीसाठी बोलावून ठाण्यातच रोखले. कोते यांनी शिवसेना स्टाईलने आरडाओरडा केल्यानंतर बैठकीसाठी शिवसैनिकांना सोडण्यात आले. मात्र प्रत्येक गाडीमध्ये स्थानिक दोन पोलिस कर्मचारी बसवण्यात आल्याचे शिवसैनिकांकडून समजले.

Bhausaheb Wakchaure
Pathardi Repeater Exam: पाथर्डीतील रिपीटर परीक्षा केंद्र संशयाच्या भोवऱ्यात; डमी विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

मटण खा, पण गेस्ट हाऊस सोडू नका!

गेस्ट हाऊसवर शिवसैनिक बैठकीसाठी एकत्र आले. साधारणःत 60 ते 70 कार्यकर्ते होते. इकडे वाकचौरे शिर्डीत पोहचले होते. त्यांचे शिंदे शिवसेनेचे नेते नितीन औताडे यांच्यासह समर्थकांनी जोरदार स्वागत केले. इकडे वाकचौंरेचे सत्कार सुरू असताना, इकडे गेस्ट हाऊसभोवती पोलिसांना बंदोबस्त लावण्यात आला होता. बैठकीत शिवसैनिक काय पावित्रा घेतात, यावरही पोलिसांचे बारकाईने लक्ष होते. या कालावधीत अगदी जेवनासाठीही पोलिसांनी बाहेर पडू दिले नाही. कार्यकर्त्यांनी पोलिसांना जेवायला जाऊ द्या अन्यथा मटणाची सोय करा, अशी मागणी केली. त्यावर पोलिसांनी बाबांनो मटण खा, पण गेस्ट हाऊस सोडू नका, अशी विनवणी करत कार्यकर्त्यांना मटणाची व्यवस्था केल्याचेही कानावर आले.

ठाकरेंऐवजी आता शिंदेचे बँनर

खा.वाकचौरे यांच्या निवासस्थानाबाहेर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी यांचे फलक लावल्याचे दिसत होते. मात्र खा. वाकचौरे यांनी आता शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांच्या आगमनापूर्वीच हे फलक हटवून त्या ठिकाणी आता पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचे फलक दिसले.

Bhausaheb Wakchaure
Pudhari Campus To Career: ‘पुढारी कॅम्पस टू करिअर’: श्रीरामपूर व अहिल्यानगरमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन

आज ना उद्या तुम्हाला तुडवणारच: कोते

आम्हच्या शिवसैनिकांना आज नजरकैदेत ठेवले होते. आम्ही उद्धव, बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. आम्हाला किती दिवस दाबून ठेवणार. आज ना उद्या आम्ही पाहून घेऊ. बंदोबस्त बाजुला ठेऊन शिर्डीत फिरवून दाखवा. तुम्हाला शिवसैनिक आणि ज्यांनी मतदान केले असे मतदार तुम्हाला तुडवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जिल्हाप्रमुख सचिन कोते यांनी दिला.

मी आज मतदार संघात आलो आहे, यापुढेही फिरणार आहे. आपण मतदार संघातील विकासकामांचे ध्येय समोर ठेऊन शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे. पश्चिमेकडून वाहून जाणारे पाणी यासह विविध विकासकामे आपल्याला पूर्ण करायचे आहेत

खा. भाऊसाहेब वाकचौरे, शिर्डी लोकसभा

खा. वाकचौरे हे शिर्डीत येणार असल्याने तत्पूर्वीच आपण संबंधितांना नोटीसा दिल्या होत्या. तसेच कोणतीही अनूचित घटना घडू नये, यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपायोजना केल्या होत्या. शिर्डीत दोघे, तर कोपरगावात चौघांना बोलावले होते.

अमोल भारती, उपाधिक्षक, शिर्डी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news