Madhi Devotees Car Accident: मढीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांची कार मुळा कालव्यात; तिघांचा बुडून मृत्यू

घोडेगाव-सोनई रस्त्यावर भीषण अपघात; एक जण बचावला, क्रेनच्या साह्याने कार बाहेर
Mula Canal Car Accident
Mula Canal Car AccidentPudhari
Published on: 
Updated on: 

घोडेगाव: मढी येथे दर्शनासाठी जात असलेल्या सिन्नर तालुक्यातील (जि. नाशिक) कासारवाडी येथील भाविकांची कार मुळा कालव्यात कोसळून तिघांचा बुडून मृत्यू झाला. या अपघातातून एक जण बचावला. घोडेगाव-सोनई रस्त्यावरील शनैश्वर दूध संघाजवळ बुधवारी (दि. २१) हा अपघात झाला.

Mula Canal Car Accident
Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत ‘करेक्ट कार्यक्रम’ कुणाचा? विखे-थोरातांच्या युतीने राजकीय समीकरणे बदलली!

प्राथमिक माहितीनुसार, कासारवाडी येथील चार जण कारने (एमएच ०३ बीव्ही ७८८४) मढी येथे दर्शनासाठी जात होते. घोडेगाव-सोनई रस्त्यावर शनैश्वर दूध संघाजवळ कालव्याच्या पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पुलावरून थेट कालव्यात कोसळली.

Mula Canal Car Accident
Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का; १२ जागांवर चुरशीच्या लढती

या अपघातात भाऊसाहेब कोंडाजी रणधीर, केरू रामभाऊ पवार (वय ७२) आणि सुभाष रामभाऊ बिडवे (वय ५७) यांचा कालव्यात बुडून मृत्यू झाला. कारमधील संदीप सदाशिव कदम हा या अपघातातून बचावला.

Mula Canal Car Accident
Mohatadevi Temple Navratri: घटी बसलेल्या महिलांचा सुरू झाला पाणावलेल्या डोळ्यांनी परतीचा प्रवास!

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. सोनईचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, उपनिरीक्षक किशोर जाधव, सहायक उपनिरीक्षक मच्छिंद्र आडकित्ते, कॉन्स्टेबल सुनील पालवे, वजीर शेख घटनास्थळी दाखल झाले.

Mula Canal Car Accident
Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोधचा पेच कायम; विखे पाटील, थोरात आणि राम शिंदेंचे प्रयत्न निष्फळ

क्रेनच्या साह्याने कालव्यातील कार बाहेर काढण्यात आली. तिघांचे मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी नेवासा येथे पाठविण्यात आले. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, सोनई पोलिस तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news