Maharashtra Fake Marriage Fraud Gang: कोपरगावात बनावट लग्नातून लाखोंची फसवणूक; नवरी पळून जाणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

लग्नानंतर दोन दिवसांत नवरी पसार; तीन जणी अटकेत, इतर आरोपींचा शोध सुरू
Fake Marriage Fraud Gang
Fake Marriage Fraud GangPudhari
Published on
Updated on

कोपरगाव/पोहेगाव: लग्न झाले आणि दोनच दिवसांत नवरी पळून जाण्याच्या आणि त्यात अनेक तरुणांची फसवणूक झाल्याच्या घटना गेल्या एक-दोन वर्षांत पुढे आल्या आहेत. लग्नाचे वय उलटून गेले, तरी वधू मिळत नसलेल्या तरुणांना हेरून त्यांच्याशी लग्न करून लुटणाऱ्या लुटारू नवऱ्या मुलींची अशी टोळीच कोपरगाव पोलिसांनी चतुर्भूज केली आहे. याबाबत तालुक्यातील रवंदा येथील तरुणाने फिर्याद दिली होती.

Fake Marriage Fraud Gang
Nevasa Sub Registrar Scam: नेवासा दुय्यम निबंधक कार्यालयात बोगस दस्त नोंदणीचे आरोप

त्याचे लग्न झाल्यानंतर दोनच दिवसांत नवरी मुलगी पळून गेली होती. नवरदेव मुलाने थेट पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी लग्नाचे खोटे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत तीन जणींनी पोलिसांनी अटक केली आहे. तीन आरोपी पसार असून, कोपरगाव तालुका पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Fake Marriage Fraud Gang
Pune Nashik Railway Project: पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प वादात; मार्ग बदलामुळे आंदोलन

कशीष सुकदेव भालेराव, न्रमता सुकदेव भालेराव, भूमी किरण निकम (सर्व रा जत्रा चौक, आडगाव नाका, नाशिक), अशोक तान्हाजी काळे, वनिता अशोक काळे (दोन्ही रा. अंगणगाव. ता. येवला, जि. नाशिक) आणि गोकुळ चिंदा पानकर (रा. मदर तेरेसा चौकाजवळ, नाशिक) अशी आरोपींची नावे आहे.

Fake Marriage Fraud Gang
Ahilyanagar Gas Shortage: अहिल्यानगरात गॅस तुटवडा; उद्योगांसाठी तातडीच्या उपाययोजना

याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक 21 सप्टेंबर 2025 ते दिनांक 31 ऑक्टोबर 2025 दरम्यान रवंदे गावातील तरुणाला लग्नाचे आमिष दाखवून 2 लाख 29 हजार रुपये, सोने व चांदीचे दागिने घेऊन फसवणूक केल्याचे फिर्याद कोपरगाव तालुका पोलिसात 18 फेब्रुवारी 2026 रोजी दाखल करण्यात आली. त्याला जाळ्यात ओढून त्याचे लग्न एका तरुणीशी लावून देण्यात आले होते. मात्र लग्नानंतर दोनच दिवसांत नवरी रोख रक्कम व दागिने घेऊन पसार झाली होती.

Fake Marriage Fraud Gang
Shrigonda Extortion Case: श्रीगोंद्यात खंडणीसाठी महिला विक्रेत्यावर हल्ला; गावबंदचा निर्णय

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना कशीश, नम्रता व भूमी यांना नाशिक येथील आडगाव नाका परिसरातून अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. या गुन्ह्याबाबत चौकशी करताना तिघींनी संगनमताने खोटे लग्न लावून फसवणूक केल्याची कबुली दिली. त्यांनी फसवणूक करून लुटलेले रोख रुपये, सोने व चांदीचे दागिनेही काढून दिले असून, ते जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणातील अशोक काळे व वनिता काळे, तसेच गोकुळ पानकर यांचा पोलिस शोध घेत आहेत. कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी, पोलिस नाईक आर. ओ. कारखेले, हेडकॉन्स्टेबल अनिता वलवे, कॉन्स्टेबल ज्योती रहाणे, जयदीप गवारे, अंबादास वाघ, श्रीरामपूरच्या अपर पोलिस अधीक्षक कार्यालयातील हेडकॉन्स्टेबल संतोष दरेकर, सचिन धनाड, राम वेताळ यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news