Kopargaon Municipal Election Tension: कोपरगाव–देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या मतदानात तणाव

बोगस मतदान व अधिकारपत्राच्या आरोपांवरून गोंधळ; पोलिस हस्तक्षेप व लाठीचार्जनंतर परिस्थिती नियंत्रणात
Kopargaon Municipal Election Tension
Kopargaon Municipal Election TensionPudhari
Published on
Updated on

कोपरगाव: कोपरगाव नगरपालिकेच्या मतदानादरम्यान श्री गो विद्यालय, माधवराव आढाव विद्यालय, निवारा, बैलबाजार परिसरातील मतदान केंद्रावर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये बोगस मतदान, मतदारांना अमिष दाखविण्यावरुन वाद उफाळून आला. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्राबाहेर काढले. दरम्यान नगराध्यक्षांसह 31 नगरसेवकांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.

Kopargaon Municipal Election Tension
Rahuri Nagar Parishad Election: राहुरी नगरपरिषद निवडणूक; आज मतदान, उद्या निकाल

दरम्यान आमदार आशुतोष काळे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेटी देवून परिस्थितीचा आढावा घेतला. भाजप व मित्रपक्ष, कोल्हे गट, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अशा प्रमुख राजकीय पक्षानी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. अनेक प्रभागांत चौरंगी व पंचरंगी लढतींमुळे राजकीय वातावरण तापले होतेे.

Kopargaon Municipal Election Tension
Ahilyanagar Second Marriage Fraud: दुसऱ्या विवाहाच्या जाळ्यात पत्नी अडकवून 30 लाखांची फसवणूक

कधी नव्हे ते यंदाच्या निवडणुकीत ‌‘लक्ष्मी‌’च्या मोकळ्या खेळाची चर्चा शहरभर रंगली आहे. थंडीमुळे सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग मंदावलेला होता. मात्र दुपारनंतर मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली. अटीतटीच्या या राजकीय लढतीत सर्व उमेदवारांचे राजकीय भविष्य मतपेटीत बंद झाले आहे. काही प्रभागातील मतदान केंद्रावर एव्हीएम मशिन बंद पडले. ते दुरुस्त केल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरूळीत सुरू झाली.

Kopargaon Municipal Election Tension
Nighoj Liquor Ban: निघोज दारूबंदी कायम; उच्च न्यायालयाकडून बंदी हटवण्यास नकार

देवळालीत पोलिसांच्या लाठीचार्जनंतर तणाव निवळला

मतदान संपण्याला दीड तास बाकी असताना प्रभाग 1 ते 5 अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील केंद्रात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. मतदाराचे अधिकार पत्र आणि ‌‘लक्ष्मी दर्शन‌’च्या आरोपामुळे दोन गट आमने सामने आले. काही क्षणात हमरी तुमरीला सुरूवात झाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत जमावाला पांगविले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली अन्‌‍ मतदान प्रक्रिया शांततेत झाली. प्रभाग 7 मधील मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याचा आरोप राजकीय नेत्यांकडून करण्यात आला. काही मतदान प्रतिनिधी जबरदस्तीने मतदारांकडून मतदान करून घेत असल्याचा दावा होत असल्याची खातरजमा करण्यासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींशी पोलिसांनी हुज्जत घातली. पारदर्शक निवडणुकीची माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने माध्यम प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली.

Kopargaon Municipal Election Tension
Shrigonda Dalmia Cement Project: श्रीगोंदा दालमिया सिमेंट प्रकल्पाला मोठा धक्का; पर्यावरणीय मंजुरी स्थगित

निवडणूक प्रक्रियेदरम्यान काही प्रभागांत कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत जमाव पांगवला. प्रभाग 4 मध्ये मतदान अधिकारी मतदारांना विशिष्ट पक्षाचे बटण दाबण्यास सूचित करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. राहुरी फॅक्टरी येथील प्रभाग 9 मध्ये भाजपचे उमेदवार वसंत कदम, महाविकास आघाडीचे प्रशांत काळे आणि शिवसेनेचे बापुसाहेब मुसमाडे यांच्यात वाद झाला. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सत्यजित कदम तेथे उपस्थित होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. राजकीय वातावरण तापले असतानाच जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, श्रीरामपूरचे अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपअधीक्षक जयदत्त भवर व निरीक्षक संजय ठेंगे यांच्या पथकाने विविध मतदान केंद्रांसह मतमोजणी स्थळाची पाहणी केली.

Kopargaon Municipal Election Tension
Ahilyanagar Shevgaon Share Market Fraud: शेवगाव शेअर बाजार फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपीचा जामीन नामंजूर

समर्थ बाबूराव पाटील सांस्कृतिक भवनात मतमोजणी

देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. भाजप, महाविकास आघाडी, शिवसेना (शिंदे गट) तसेच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे निवडणूक रंगतदार ठरली. सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. निवडणूक पार्श्वभूमीवर दंगल नियंत्रण पथक व अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. नगरपरिषद निवडणुकीची मतमोजणी आज (दि.21) सकाळी 10 वाजता समर्थ बाबूराव पाटील सांस्कृतिक भवन येथे होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा पवार यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news