

श्रीगोंदा: तालुक्यातील निमगाव खलू येथे शेतकऱ्यांचा विरोध असताना बळजबरीने सुरू केलेल्या दालमिया सिमेंट प्रकल्पाला राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरण मंडळाने दालमिया भारत ग्रीन व्हिजन लिमिटेड दिल्लीची पर्यावरणीय मंजुरी स्थगित केली आहे.
त्यासाठी विविध कारणे दिली आहेत .प्रकल्प प्रवर्तकाने प्लॅन मंजुरी स्थानिक प्राधिकरणकडून मिळणारी बांधकाम परवानगी व उद्योग करण्यापूर्वी किंवा उद्योग सुरू करण्याची परवानगी यांची ना हरकत प्रमाणपत्र सादर केले नाहीत. परिणामी कंपनीचे पर्यावरणीय मंजुरी स्थगित करण्यात आल्याची माहिती माजी सरपंच संदीप कलगुंडे व माहिती अधिकार कार्यकर्ता शंकर शिंदे यांनी दिली.
दालमिया कंपनी निमगाव खलू गावात शेतकऱ्याची सुपीक ऊसलागवडीची जमीन दलालांच्या मध्यस्थीने खरेदी करून आपला प्रकल्प पुढे रेटत आहे. भीमा नदीचे पाणी परवानगी त्यांनी मिळविली. निमगाव, गार, कौठा, अजनूज परिसरातील शेतकरी प्रकल्पाच्या विरोधात आहेत. प्रदूषण आणि उडणाऱ्या कणामुळे शेती नापीक संकट येणार असल्याचा आरोप आहे. यामुळे विरोध असताना कंपनी प्रकल्प पुढे रेटत आहे
सेका कमिटीने गेल्या 11 नोव्हेंबरला पुढील कार्यवाहीसाठी प्राधिकरणकडे अंतिम मंजुरी मिळविण्याठी प्रस्ताव दाखल केला. त्यावर दि.21 नोव्हेंबर मिटिंग झाली. पण आजपर्यंत सदर कमिटीने कंपनीला पर्यावरणीय मंजुरीवर निर्णय प्रलंबित आहे. पण त्या अगोदर कंपनीने प्रत्यक्ष कामाला सुरवात केली व सदर कामकाज करताना त्यांनी कोणत्याही विभागाकडून परवानगी घेतली नाही. सदर कामाची पाहणी केली आसता त्यांनी सार्वजनिक रस्ता खोदण्याचे काम चालू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीतून ये-जा करणे अवघड झाले आहे.
राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरण मंडळने दालमिया भारत ग्रीन व्हिजन लिमिटेड दिल्ली यांची पर्यावरणीय मंजुरी स्थगित केली आहे. त्यासाठी प्रकल्प प्रवर्तकाने प्लॅन मंजुरी स्थानिक प्राधिकरण कडून मिळणारी बांधकाम परवानगी व उद्योग करण्यापूर्वी किंवा उद्योग सुरू करण्याची परवानगी यांची ना हरकत प्रमाणपत्र सादर केले नव्हते त्यामुळे कंपनीचे पर्यावरणीय मंजुरी स्थगित करण्यात आली आहे.