Karjat POCSO Case: मुख्याध्यापकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ; पोस्को अंतर्गत गुन्हा, आरोपी अटकेत

शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप; कर्जत न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली
Assault
AssaultPudhari
Published on
Updated on

नगर: मुख्याध्यापकानेच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करत तिचा छळ केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी ही घटना कर्जत तालुक्यातील एका गावात घडली. याबाबत बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षणाच्या कायद्यानुसार (पोस्को) गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकाला अटक केली आहे. रामराव प्रभाकर भोसले असे आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Assault
Shirdi Pedha Seizure: शिर्डीत एफडीएची मोठी कारवाई; 600 किलो निकृष्ट पेढे जप्त, दोन लाखांचा साठा नष्ट

कर्जतच्या एका खेडेगावात उच्चपदस्थ अधिकाऱ्याशी संबंधित ही शाळा असल्याची चर्चा आहे. वाढदिवसाचे निमित्त साधत आरोपी भोसले याने भेटवस्तू देत मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. संधी मिळताच तिच्याशी अश्लील संवाद साधत शरीरसुखाची मागणी केली. आरोपी भोसलेच्या या वर्तनाने घाबरलेल्या मुलीने तेथून पळ काढला. त्यानंतरही आरोपी भोसलेचे अश्लील वर्तन थांबले नाही. ‘परीक्षेत गुण कमी का पडले, आता तुला कळेल,’ असे म्हणत तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

Assault
Ahilyanagar Police Transfers: अहिल्यानगर पोलिस दलात मोठा फेरबदल; 58 अधिकारी बदलले

या प्रकरणाची माहिती गावात पसरल्यानंतर संबंधित मुलीच्या पालकांनी पोलिसात धाव घेतली. मुलीनेच यासंदर्भात फिर्याद दिली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापक भोसले यास अटक केली. शिक्षणाच्या पवित्र मंदिरात तेही जबाबदार व्यक्तीने असे वर्तन केले तर विद्यार्थिनींच्या सुरक्षेचे काय? असा सवाल करत संतप्त पालकांनी शाळेत धाव घेतली.

Assault
Fifth Standard Approval Rule: पटसंख्येच्या नव्या नियमामुळे जिल्ह्यातील 60 गावांतील पाचवीचे वर्ग अडचणीत

पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक अण्णासाहेब चव्हाण यांनी पथकासह शाळेत जाऊन पालकांची समजूत काढली व शांततेचे आवाहन केले. पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी आणखी काही माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले. आरोपी मुख्याध्यापक रामराव भोसले यास कर्जत न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Assault
Deolali Pravara Cow Death: देवळाली प्रवरात वीजतारा तुटून आठ गायींचा मृत्यू; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

पीडितेची हिंमत अन्‌ तो गजाआड

ही शाळा राज्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याशी संबंधित असून त्यांचे एक नातलाग राजकीय पदाधिकारी असल्याचे समजते. पोलिस पाटीलसारख्या पदाचेही या घटनेला कंगोरे असल्याची चर्चा गावात आहे. अशी मोठी पार्श्वभूमी असतानाही पीडित मुलीने मोठ्‌या हिमतीने पोलिसांत फिर्याद दिल्याने शिक्षकी पेशाला काळीमा फासणारा मुख्याध्यापक गजाआड होऊ शकल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news