Ahilyanagar Jilha Parishad Construction Department Audit: अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे लेखापरीक्षण सुरू
नगर: जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे लेखापरीक्षण करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक विभागाचे पाच सदस्यीय पथक जिल्हा परिषदेत तळ ठोकून आहे.
दरम्यान, बांधकाम विभागांत्तर्गत झालेले कामवाटप, साहित्य खरेदी, पूर्ण-अपूर्ण कामे, झालेला खर्च, याबाबतचे दप्तर तपासणी केली जात आहे. संबंधित माहिती लेखापरीक्षकांना उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना सहायक आयुक्तांनी अहिल्यानगर जिल्हा परिषदेला दिल्या आहेत.
सन 2024-25 या आर्थिक वर्षाचीही तपासणी केली जात आहे. यामध्ये, बांधकाम विभागातील सरळसेवा पदोन्नती, मंजूर रोस्टर, नोंदवही. विभागाकडील सर्व लेखाशिर्षाचा जमा खर्च ताळमेळ अहवाल, विभागाअंतर्गत मागील तीन वर्षाचा निविदा व ई निविदांची माहिती व याद्या, विभागीय चौकशी प्रलंबित प्रकरणे, निलंबन, अनाधिकृत गैरहजर प्रकरणे, प्रलंबित सेवा निवृत्ती प्रकरणे, न्यायालयीन प्रकरणे इत्यादी.
विभागप्रमुखांची दैनंदिनी, आंतरजिल्हा बदल्या. प्रलंबितता, वार्षिक अहवाल. साहित्य खरेदी सादील अहवाल, लेखाशिर्षनिहाय सन 2022-23, 2023-24, तसेच 2024-25 या कालावधीतील मंजूर कामे, पूर्ण कामे, अपूर्ण कामे, आर्थिक, भौतिक अहवालासह कामाची यादी तपासणी केली जाणार आहे. तसेच कंत्राटदार नोंदणी दिलेल्या मान्यता व प्राप्त प्रस्ताव. स्थानिक निधी लेखाचे प्रलंबित परिच्छेद इत्यादी माहिती घेतली जाणार आहे.
सेसच्या जमा खर्चावरही नजर
जिल्हा परिषद सेस अंतर्गत तपासणीचाही यात समावेश आहे. यात वर्षात किती तरतूद प्राप्त झाली. त्याचा आराखडा, सभेची मान्यता. ठरावची प्रत, कामांच्या प्रशासकीय मान्यता आदेश व अखर्चित निधी. जिल्हा परिषदे देखभाल दुरुस्ती व त्यावर झालेला खर्च. तसेच काम वाटप माहिती व मागील तीन वर्षाच्या काम वाटपाच्या याद्याचीही पडताळणी केली जाणार आहे.

