HSC Board Exam: बारावीची परीक्षा उद्यापासून; 62 हजार विद्यार्थ्यांसाठी 116 केंद्रे सज्ज

कॉपीमुक्त परीक्षेसाठी 38 संवेदनशील केंद्रांवर ड्रोन व अतिरिक्त पोलिस बंदोबस्त
Board Exam
Board ExamPudhari
Published on
Updated on

नगर : यंदाची बारावी बोर्डाची परीक्षा उद्या मंगळवार (दि.10) पासून सुरू होत आहे. यंदा 62809 विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार असून, त्यासाठी 116 परीक्षा केंद्र सज्ज करण्यात आले आहेत. याशिवाय कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. बारावीचा पहिला पेपर इंग्रजीचा असणार आहे.

Board Exam
Gram Panchayat Administrator: जिल्ह्यातील 758 ग्रामपंचायतींची मुदत संपली; कारभार प्रशासकांच्या ताब्यात

10 बारावीची ते 18 मार्चपर्यंत बारावी परीक्षा होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासह शिक्षणाधिकारी माध्यमिकच्या संध्या गायकवाड, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, योजना शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांनी कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रत्येक पेपरला आणि प्रत्येक परीक्षा केंद्रावर गटशिक्षण अधिकारी कार्यालयामार्फत बैठे पथक नियुक्त करण्यात आलेले आहे. प्रश्नपत्रिका व सीलबंद पाकिटे हस्तांतरीत करताना बोर्डाच्या सूचनेप्रमाणे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे.

Board Exam
Women Auto Rickshaw Driver: महिला रिक्षा चालक प्रशिक्षणातून अहिल्यानगरमध्ये महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय

जिल्ह्यातील सर्व विभागांचे खातेप्रमुख, तहसीलदार व गटविकास अधिकारी परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत. परीक्षा केंद्र स्तरावर दक्षता पथक तैनात आहेत. परीक्षा केंद्रावर सीसीटिव्ही बसविण्यात आले आहे. केंद्रांवर नजर ठेवण्यासाठी झूम ॲपचा वापर केला जाणार आहे. संवेदनशील केंद्र निश्चित करून तेथे परीक्षा कालावधीत राजपत्रित अधिकारी यांच्या भेटीचे नियोजन करण्यात आलेले आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. केंद्राच्या 100 मीटर आतील झेरॉक्स दुकाने बंद असणार आहेत.

Board Exam
Tamasha Folk Art Maharashtra: तमाशा ही महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा; कलाकारांना शासनाने आर्थिक पाठबळ द्यावे – डॉ. रावसाहेब कसबे

दरम्यान, कॉपीमुक्त परीक्षा घेतानाच विद्यार्थ्यांना उत्साहात, आत्मविश्वासाने आणि भितीमुक्त पेपर देता यावेत, याचीही प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. त्यासाठी परीक्षा केंद्रावर आवश्यक त्या भौतिका सुविधा दिल्या जाणार आहेत, असेही सांगितले जात आहे.

Board Exam
Strawberry Farming Akole: आदिवासी भागात स्ट्रॉबेरीची यशस्वी नगदी शेती; रंध्यात प्रयोगशील शेतकऱ्याचा नवा आदर्श

संंवेदनशील 38 केंद्रांवर खडा पहारा

कॉपीमुक्त परीक्षेसाठी यंदा पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आलेला आहे. 116 केंद्रांवर पोलिस नियुक्त असणार आहेत. याशिवाय 38 संवेदनशील केंद्रांवर अधिकचा फौजफाटा नियुक्त करण्यात आलेला आहे. याशिवाय तेथे ड्रोनची नजर असणार आहे. तसेच सर्व खाते प्रमुख, तहसीलदार, बीडीओ, नगरपालिका सीओंचे बैठे पथक ‌‘त्या‌’ 38 केंद्रांवर तळ ठोकून असणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश काढले आहेत.

Board Exam
RadhaKrishna Vikhe Patil: गोदावरी खोऱ्यासाठी 90 हजार कोटींची योजना; घरकुलात अडथळे आणणाऱ्यांचा बंदोबस्त करणार – विखे पाटील

परीक्षार्थी 62809

परीक्षा केंद्र 116

संवेदनशील केंद्र 38

परीरक्षक 21

भरारी पथक 7

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news