Ahilyanagar Copy Free Exam Initiative: कॉपीमुक्त परीक्षेसाठी ‘प्रेरणा’ उपक्रम

प्रभावशाली व्यक्तींचे मार्गदर्शक व्हिडिओ व संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार
Ahilyanagar Copy Free Exam Initiative
Ahilyanagar Copy Free Exam InitiativePudhari
Published on
Updated on

नगर: इयत्ता दहावी-बारावीची कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना आवाहन केले जात आहे. त्याचसोबत आता जिल्ह्यातील प्रभावशाली व्यक्तींचे कॉपीमुक्तीचे ‌‘मार्गदर्शक व्हिडिओं व संदेश‌’ देखील परीक्षार्थी विद्यार्थ्यांपर्यंत सोशल माध्यमातून पोहचवले जाणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून ‌‘प्रेरणा‌’ हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, तो राज्यासाठी निश्चितच ‌‘प्रेरणादायी‌’ ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या संकल्पनेतून ‌‘प्रेरणा‌’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

Ahilyanagar Copy Free Exam Initiative
Ahilyanagar Municipal Nominated Members: स्वीकृत नगरसेवकांची पात्रता कडक; स्थायी समितीचा फॉर्म्युला निश्चित

नेमका काय आहे उपक्रम ?

या उपक्रमात महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील, पद्मभूषण आण्णा हजारे, पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, तसेच प्राचार्य, मुख्याध्यापक, विषय शिक्षक तसेच विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक, तसेच जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तिमत्वे यांच्या कॉपीमुक्ती संदेशाचा व्हिडिओ तसेच लिखित संदेश संकलन केला जाणार आहे, तो विविध माध्यमांतून परीक्षार्थीपर्यंत्त पोहचवला जाणार आहे.

Ahilyanagar Copy Free Exam Initiative
Wambori Chari Pipeline Burst: राहुरीत वांबोरी चारीची पाइपलाइन फुटली; २० हेक्टर शेती पाण्याखाली

‌‘आनंददायी परीक्षा पॅटर्न‌’

माहिती तंत्रज्ञानातून तयार करण्यात आलेल्या अहिल्यानगर ‌‘आनंददायी परीक्षा पॅटर्न‌’ या वेबपेजवर हे व्हिडिओ व संदेश पाहता येतील. त्याचबरोबर शिक्षक, पालक, मुख्याध्यापक व शिक्षणप्रेमी यांचे व्हॉट्सअप ग्रुप तसेच सोशल मीडियावर देखील हे व्हिडिओ व संदेश शेअर केले जाणार आहेत. उपक्रमासाठी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, सर्व उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, तसेच शिक्षक अमोल बागुल यांचे सहकार्य लाभत आहे.

कॉपीमुक्तीसाठी सीईओंच्या मार्गदर्शनात ‌‘प्रेरणा‌’ उपक्रम हाती घेतला आहे. यातून निश्चितच कॉपीमुक्त परीक्षा घेण्यात यश मिळेल.

संध्या गायकवाड, शिक्षणाधिकारी माध्यमिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news