Jamkhed Shetkari Bhavan: जामखेडमध्ये शेतकरी भवनासाठी 31.96 लाखांचा निधी मंजूर

बाजार समितीत मुक्काम व सुविधा प्रश्न सुटणार; प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश
Jamkhed Shetkari Bhavan
Jamkhed Shetkari BhavanPudhari
Published on
Updated on

जामखेड: येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्यासाठी सरकारने 31 लाख 96 हजार 5 रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी या महत्त्वपूर्ण कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या निर्णयामुळे शेतीमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुक्कामाचा व मूलभूत सुविधांचा प्रश्न एकाच ठिकाणी सुटणार आहे.

Jamkhed Shetkari Bhavan
Ahilyanagar Theft Cases: नगरमध्ये चोऱ्यांचा सुळसुळाट; तोफखाना पोलिसांची उकल दर खालावला

सरकारच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून 27 मार्च 2026 रोजी यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. नवीन शेतकरी भवन बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून 1 कोटी 27 लाख 84 हजार 17 रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली होती.

Jamkhed Shetkari Bhavan
Akole Liquor Protest: अकोल्यात दारूबंदीचा एल्गार; 1 एप्रिलपासून बेमुदत उपोषणाचा इशारा

या मंजूर रकमेच्या 50 टक्क्यांप्रमाणे 63 लाख 92 हजार 9 रुपये इतके शासन अनुदान या बांधकामासाठी अनुज्ञेय ठरले आहे. या अनुज्ञेय अनुदानाच्या 50 टक्के रक्कम म्हणजेच 31 लाख 96 हजार 5 रुपये पहिला टप्पा म्हणून वितरित करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. हा उपलब्ध झालेला निधी वितरित करण्यासाठी पुणे येथील राज्याच्या पणन संचालकांना मान्यता देण्यात आली आहे.

Jamkhed Shetkari Bhavan
Bhondu Kharat Controversy: भोंदू खरात प्रकरणात नवे खुलासे; राजकीय दबाव आणि अंधश्रद्धेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

मंजूर करण्यात आलेला पहिल्या टप्प्यातील हा निधी येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आधार संलग्नित बँक खात्यावर पणन संचालनालयामार्फत थेट जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे या भवनाच्या प्रत्यक्ष बांधकामाला आता गती मिळणार आहे.

Jamkhed Shetkari Bhavan
Ahilyanagar Fake Milk Racket: बनावट दूध प्रकरणात आणखी एक अटक; आरोपींची संख्या सहा

राज्यातील ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकरी भवन उपलब्ध नाही, तेथे नवीन भवन बांधणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे जामखेडमधील हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून, या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news