Ahilyanagar Theft Cases: नगरमध्ये चोऱ्यांचा सुळसुळाट; तोफखाना पोलिसांची उकल दर खालावला

158 पैकी अवघे 35 गुन्हे उघड; नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली
Theft Case
Theft CasePudhari
Published on
Updated on

नगर: शहरातील तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत साधारण एक वर्षभरामध्ये चोऱ्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विविध भागांत घरफोडी, दुचाकी चोरी, मोटारकार चोरी आणि दुकाने फोडण्याच्या घटना सातत्याने घडल्या आहेत. त्यातील बोटावर मोजण्या इतक्याच गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले.

Theft Case
Akole Liquor Protest: अकोल्यात दारूबंदीचा एल्गार; 1 एप्रिलपासून बेमुदत उपोषणाचा इशारा

शहरातील तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या 14 महिन्यात घरफोडी, दिवसा घरफोडी, चोरीच्या घटना घडल्या. अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगर हे उच्चभू्र लोकांची वसाहत आहे. तर, तपोवन रोड, बोल्हेगाव परिसरात नव्याने वसाहती निर्माण होत आहे. दिवसेंदिवस पोलिस ठाण्याच्या हद्दीत नव्याने वसाहती निर्माण होत असल्याने पोलिसांची गस्त कमी पडत आहे. रात्रीच्या वेळी बंद घरांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

Theft Case
Bhondu Kharat Controversy: भोंदू खरात प्रकरणात नवे खुलासे; राजकीय दबाव आणि अंधश्रद्धेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

गेल्या काही दिवसांपूर्वी बोल्हेगाव भागात चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसून आले असले तरी अद्यापि कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. त्यात गत आठवड्यात नगरसेवक कुमार वाकळे यांनी बोल्हेगाव रस्त्यावरील पथकदिवे चोरी जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करीत पोलिस ठाण्यात येवून निवेदन दिले होते.

Theft Case
Ahilyanagar Fake Milk Racket: बनावट दूध प्रकरणात आणखी एक अटक; आरोपींची संख्या सहा

बोल्हेगाव, सावेडी, तपोवन रोड, गुलमोहर रोड, बालिकाश्रम रोड परिसरात गेल्या वर्षभरामध्ये वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. चोऱ्या वाढल्या, पण तपास मात्र शून्य आहे, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. पोलिसांकडून गस्त वाढविण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. पोलिस प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि सुरक्षेची उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले.

Theft Case
Nagar Urban Bank Scam: नगर अर्बन बँक घोटाळा; 72 मालमत्ता जप्तीचा निर्णय

गुन्हे शोध पथक अपयशी

पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या चोऱ्या, घरफोड्याच्या गुन्ह्यांची उकल करण्याची प्राथमिक जबाबदारी पोलिस ठाण्यात नियुक्त असलेल्या गुन्हे शोध पथकाची असते. मात्र, तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हे शोध पथक चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येते.

चोरीचे 158 पैकी केवळ 35 गुन्हे उघड

जानेवारी ते डिसेंबर 2025 मध्ये तोफखाना पोलिस ठाण्यात चोऱ्या, घरफोड्या, दिवसा चोऱ्या असे एकूण 127 गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी अवघ्या 24 गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर, जानेवारी ते फेब्रुवारी 2026 या दोन महिन्यात सुमारे 31 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी अवघ्या 11 गुन्ह्यांचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना सपशेल अपयश आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news