Akole Liquor Protest: अकोल्यात दारूबंदीचा एल्गार; 1 एप्रिलपासून बेमुदत उपोषणाचा इशारा

भरवस्तीतल्या दारू दुकानांवर कारवाईची मागणी; महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
Liquor
LiquorPudhari
Published on
Updated on

अकोले: अकोले शहरातील कोल्हार घोटी रस्त्यालगत व परिसरात असणारी भरवस्तीतील दारू दुकाने हटविण्यासाठी दि.1 एप्रिल 2026 पासून दारूबंदी आंदोलनाचे प्रनेते हेरंब कुलकर्णी यांच्या उपस्थितीत अकोले पोलिस स्टेशनसमोर बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा अकोले शहर व सर्वपक्षीय कार्यकर्ते व सजग नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Liquor
Bhondu Kharat Controversy: भोंदू खरात प्रकरणात नवे खुलासे; राजकीय दबाव आणि अंधश्रद्धेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले की, अकोले शहरात भर वस्तीत असणाऱ्या खटपट नाक्या वरील कोल्हार - घोटी राज्य मार्गालगत डॉ. विराज शिंदे यांच्या हॉस्पिटल शेजारील देशी दारूचे दुकान व शिवाजी चौक रस्त्यालगत विजय फुट वेअर समोरील वाईन शॉप दुकान आहे. यामुळे नागरिकांना विशेषतः येणाऱ्या जाणाऱ्या महिला, तरुणींना मोठा त्रास सहन करावा लागतो.

Liquor
Ahilyanagar Fake Milk Racket: बनावट दूध प्रकरणात आणखी एक अटक; आरोपींची संख्या सहा

आमदार डॉ. किरण लहामटे यांनी अलीकडेच घेतलेल्या आमसभेमध्ये ही दुकाने हलविण्याच्या संदर्भात गंभीर चर्चा होऊन देखील अद्याप यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही. 15 दिवसाच्या आत संबंधित दुकाने शहराबाहेर हलवावी अन्यथा अकोले पोलिस स्टेशन समोर तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्ते, नागरिक दारूबंदी आंदोलनाचे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्या उपस्थितीत 1 एप्रिल 2026 पासुन मुला-बाळांसह महिला मोठ्या संख्येने बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे

Liquor
Nagar Urban Bank Scam: नगर अर्बन बँक घोटाळा; 72 मालमत्ता जप्तीचा निर्णय

निवेदनावर ज्येष्ठ नेते जे.डी.आंबरे पाटील, डॉ. नीलेश सहाणे, डॉ. विराज शिंदे, डॉ. साहेबराव वैद्य, डॉ. कमलाकर सातपुते, डॉ. नितीन चासकर, डॉ. दर्शन बंगाळ, डॉ. संदेश भांगरे,डॉ. आसिफ तांबोळी, सोमेश्वर धुमाळ, सुनील डांगरा, अमोल वाडगे, पराग वाडगे, भागवत नवले, सतीश वाकचौरे, दिनेश बुब,प्रा.अरुण पवार, नामदेव भालेराव, श्यामसुंदर मुंदडा, रवींद्र चोथवे, सतीश चोथवे, दीप लहामगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Liquor
Shrirampur Rain Crop Damage: श्रीरामपूरमध्ये अवकाळी पाऊस व गारपीटीचा तडाखा; पिकांचे मोठे नुकसान

अवैध दारू व व्यवसाय बंद न करणाऱ्या पोलिस निरीक्षक यांच्यावर कारवाई करावी,त्याचप्रमाणे ज्यांच्या हद्दीत दारू सुरू आहे त्या बीटचे अंमलदार निलंबित करावे. राजूर जवळच्या अनेक गावात दारू विकली जाते, त्याची नावे त्यांना दिली, पण अनेकदा सांगूनही ते भेटी करत नाहीत. त्यामुळे राजूर गावातील दारू बंद न झाल्यास राजूर पोलिस स्टेशन समोर उपोषणाला बसणार आहे.

हेरंब कुलकर्णी, अशासकीय सदस्य, दारू विरोधी समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news