Bhondu Kharat Controversy: भोंदू खरात प्रकरणात नवे खुलासे; राजकीय दबाव आणि अंधश्रद्धेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

मिरगाव मंदिर भेटींची चर्चा, ‘साप दाखवला’ दाव्याने खळबळ; कायदेशीर कारवाईची मागणी
Ashok Kharat Case
Ashok Kharat CasePudhari
Published on
Updated on

नगर: राजकीय दबावाखाली काम करताना कधी कधी विवेकाला मूक साक्षीदार बनवून काही गोष्टी नाईलाजाने कराव्या लागतात. भोंदू खरात प्रकरणातही अशाच काही घटना घडल्या. त्या काळातील एक मंत्री लवाजम्यासह मुंबईहून बैठकीसाठी शिर्डीला आले तेव्हा, त्यांच्यासोबत नगर झेडपीच्या तत्कालीन दोन अधिकाऱ्यांनाही मिरगावच्या मंदिरात जावे लागले होते. त्यावेळी दक्षिणेतील एक बडा नेताही तेथे ‌‘अगोदरपासूनच वेटिंग‌’वर होता, अशी चर्चा आता बाहेर आली आहे.

Ashok Kharat Case
Ahilyanagar Fake Milk Racket: बनावट दूध प्रकरणात आणखी एक अटक; आरोपींची संख्या सहा

मागील सरकारमध्ये मंत्री असलेल्या एका नेत्यासोबत अहिल्यानगर झेडपीच्या दोन अधिकाऱ्यांना ‌‘प्रोटोकॉल‌’ म्हणून शिर्डीत जावे लागले होते. त्यानंतर त्या मंत्र्यांनी आपली गाडी मिरगावकडे ‌‘दर्शनासाठी‌’ पुढे नेली. त्यामुळे अधिकाऱ्यांचाही फौजफाटा त्यांच्या मागे गेला होता. ज्या वेळी नगरचा फौजफाटा मंदिराबाहेर पोहचला, त्या वेळी नगरचा एक नेताही त्या ठिकाणी हजर होता. त्या नेत्याने ‌‘साहेब तुम्ही पण...?‌’ असे म्हणताच एकच हसा पिकला. या वेळी अधिकाऱ्यांनी ‌‘आम्ही साहेबांसोबत आलो आहोत, त्यांची पूजा झाल्यानंतर आम्ही परतीच्या दिशेने जाणार‌’ असे सांगतले.

Ashok Kharat Case
Nagar Urban Bank Scam: नगर अर्बन बँक घोटाळा; 72 मालमत्ता जप्तीचा निर्णय

खरे तर, शिक्षणाने आणि अनुभवाने परिपक्व (!) असलेल्या त्या अधिकाऱ्यांचा अंधश्रद्धेवर कणभरही विश्वास नव्हता. मात्र परिस्थितीपुढे त्यांनी मौन पत्करत मंदिराबाहेर शांतपणे बसणे पसंद केले. त्यावेळी नाशिककडील काही अधिकारीही प्रोटोकॉलला होते. यावेळी गप्पा रंगल्या आणि त्यात एकाने ‌‘बाबा चमत्कारिक आहे. काल रात्री तुम्ही काय खाल्लं तेही सांगतो आणि तुमचा भूतकाळही अचूक सांगतो.‌’ हे ऐकून एक अधिकारी गडबडलेच. काही जण आचंबित झाले तर काहींच्या अंगावर काटा आला. एकाने तर ‌‘आत जायलाच नको,‌’ असे म्हणत तेथून काढता पाय घेतल्याची सुरस कथा समजली.

Ashok Kharat Case
Shrirampur Rain Crop Damage: श्रीरामपूरमध्ये अवकाळी पाऊस व गारपीटीचा तडाखा; पिकांचे मोठे नुकसान

दरम्यान, मंत्र्यांची पूजा झाल्यानंतर अधिकारी परतले आणि नगरच्या ‌‘त्या‌’ नेत्याने मंदिरात दर्शन घेतले, अशी माहिती हाती येते. मिरगाव येथील मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्यांमध्ये नगरचे तत्कालीन जिल्हाधिकारी, तत्कालीन विभागीय आयुक्त तसेच साखर सहसंचालक विभागातील ‌‘ते‌’ अधिकारीही गेले होते, असे फोटो बाहेर आल्याचे पाहिले होते, त्यात आता झेडपीच्या दोन अधिकाऱ्यांनाही ‌‘प्रोटोकॉल‌’मुळे मिरगावची सफर घडल्याचे पुढे येत आहे.

Ashok Kharat Case
Newasa Student Newspaper Library: नेवाशातील विद्यार्थ्यांचा अनोखा पुढाकार; खाऊच्या पैशातून सुरू केले वर्तमानपत्र वाचनालय

खरातने शुक्राचार्य मंदिरात दाखवला साप?

कोपरगाव येथील गुरु शुक्राचार्य मंदिरात भोंदू खरात येऊन गेल्याचा दावा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केला आहे. जिल्ह्यातील एका निवृत्त उच्चपदस्थ पोलिस आधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भोंदू अशोक खरात शुक्राचार्य मंदिरात दोन वर्षापूर्वी आला होता. काही ट्रस्टी तेव्हा उपस्थित होते. भोंदू बाबाने डोळे मिटायला सांगून तेथे नाग प्रगट केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे भोंदू बाबा व ट्रस्टींवर जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी चांदगुडे यांनी केली आहे. मंदिराचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांना याबाबत विचारले असता, त्यांनी चांदगुडे यांनी केलेला आरोप चुकीचा असल्याचे सांगितले. खरात याने गुरु शुक्राचार्य मंदिरात पूजा केलेली नाही, ती पूजा प्रतित्र्यंबकेश्वर श्री कचेश्वर मंदिरात अंधारात केली होती, त्या वेळी त्याने साप दाखवला होता, त्या वेळी आम्ही विश्वस्तांसह 14 जण उपस्थित होतो, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले.-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news