Guha Fake Student Enrollment Case: गुहाच्या बोगस पटसंख्या प्रकरणात १३ जणांना नोटिसा; सहा मुख्याध्यापक अडचणीत

दोन शिक्षिका आणि पाच शिक्षकांकडूनही खुलासा मागवला; जिल्हा परिषद प्रशासनाची कारवाई
Schools
SchoolsPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: गुहा येथील बोगस पटसंख्या प्रकरणात संबंधित मुख्या्ध्यापकाच्या निलंबनानंतर आता विद्यार्थ्यांचे दाखले पुरवणाऱ्या ‘त्या’ सहा मुख्याध्यापकांनाही कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. गुहाच्या तत्कालीन दोन शिक्षिका आणि सध्याचे पाच शिक्षक यांच्यासह एकूण 13 जणांना प्रशासनाने नोटिसा काढल्याने शिक्षक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Schools
Rojgar Hami Yojana Pending Payments: रोहयोची १५ कोटींची देयके चार वर्षांपासून थकीत; पाथर्डीतील शेतकरी आर्थिक संकटात

गुहा शाळेत संचमान्यतेसाठी बोगस विद्यार्थी दाखवण्यात आले होते. तक्रारीनंतर चौकशी होऊन गुहा शाळेच्या मुख्याध्यापकांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर या शाळांना विद्यार्थ्यांचे दाखले पुरवणाऱ्या सहा मुख्याध्यापकांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनीही नोटिसा बजावल्या आहेत.

Schools
Sugarcane Farmers Protest: ३७०० रुपये पहिली उचल देण्याच्या मागणीसाठी ऊस उत्पादकांचा आक्रोश मोर्चा

त्यामध्ये, संबंधित विद्यार्थी हे तुमच्या शाळेत बसत असताना, शिवाय पालकांची मागणी नसतानाही, त्यांची दाखले गुहा शाळेत कसे अन् कोणाच्या आदेशावरून ते दिले गेले, इत्यादीचा खुलासा मागवण्यात आला आहे. तसेच गुहा शाळेत अतिरीक्त ठरलेल्या तसेच नियमित बदलीने गेलेल्या दोन शिक्षिकांनाही नोटीस काढण्यात आली आहे.

Schools
Fake Liquor Seizure: बनावट दारू निर्मिती व वाहतुकीवर कारवाई; १०.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त

तर गुहा शाळेत कार्यरत पाच शिक्षकांनाही गुणवत्ता ढासळल्याप्रकरणी नोटीस बजावून खुलासा मागण्यात आल्याचे समजले. दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाने बोगस विद्यार्थी संख्या हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याचे पहायला मिळत आहे.

Schools
Fodder Cultivation Scheme: चारा टंचाईवर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून चारा लागवड; हेक्टरी १.१३ लाखांपर्यंत तरतूद

‘त्या’ मुख्याध्यापकांचा खुलासा काय असेल?

गुहा शाळेला विद्यार्थी पुरवल्याप्रकरणी, गुहाची लांबे पठाण वस्ती, वांबोरी स्टेशन, बीडगर वस्ती मांजरी, पिंपळगाव फुणगी, हनुमान वस्ती पिंपळगाव फुणगी आणि गंगापूर शाळेच्या संबंधित मुख्याध्यापकांना सीईओंनी नोटीसा बजावल्या आहेत. सात दिवसांत त्यांनी खुलासा सादर करावा, अशाही सूचना केल्याचे सूत्रांकडून समजले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.