Sugarcane Farmers Protest: ३७०० रुपये पहिली उचल देण्याच्या मागणीसाठी ऊस उत्पादकांचा आक्रोश मोर्चा

जिल्हाधिकाऱ्यांची २६ नोव्हेंबरला कारखानदारांची बैठक; मंगळवारपासून ऊसतोड बंदचे निर्देश, राजू शेट्टी यांचे आंदोलन स्थगित
Sugarcane Farmers Protest
Sugarcane Farmers ProtestPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: उसाला चार हजार रुपये भाव मिळालाच पाहिजे या मागणीसाठी स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्‍या नेतृत्‍वाखाली सोमवारी (दि. २३) ऊसउत्‍पादक शेतकर्‍यांचा आक्रोश मोर्चा जिल्‍हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्याची दखल घेत जिल्‍हा प्रशासनाने ऊसदर निश्‍चितीसाठी गुरुवारी (दि. २६) कारखानदारांची बैठक बोलावली असून, सर्व कारखान्यांच्या अध्यक्षांना उपस्‍थित राहण्‍याचे निर्देश पत्राद्वारे देण्यात आले. तोपर्यंत मंगळवारपासून (दि.२४) ऊस तोडणी बंद ठेवण्याची सूचनाही या पत्रात कारखान्यांना करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने दिलेल्या या पत्रामुळे शेट्टी यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. २६ रोजी ३७०० रुपये पहिली उचल देण्‍याचा निर्णय न झाल्‍यास २८ पासून साखर कारखान्‍यांकडे जाणारे सर्व रस्‍ते रोखण्‍याचा, तसेच रेल रोको आंदोलनाचा इशारा त्‍यांनी दिला.

Sugarcane Farmers Protest
Fake Liquor Seizure: बनावट दारू निर्मिती व वाहतुकीवर कारवाई; १०.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त

उसाला प्रतिटन ३७०० रुपये पहिली उचल आणि ३९०० रुपये दर मिळावा या मागणीसाठी शेट्टी यांच्‍या नेतृत्‍वाखाली सोमवारी ऊसउत्‍पादक शेतकर्‍यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. खासदार नीलेश लंके, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठल लंघे, माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अनिल धनवट, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सीताराम काकडे, हर्षदा काकडे, रावसाहेब लवांडे, रवी मोरे, अभिजित पोटे आदी सहभागी झाले होते.

Sugarcane Farmers Protest
Fodder Cultivation Scheme: चारा टंचाईवर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून चारा लागवड; हेक्टरी १.१३ लाखांपर्यंत तरतूद

शासकीय विश्रामगृहाच्‍या पटांगणात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. राजकीय पदे, मुलांचे भविष्य आणि सत्तेची गणिते जुळविण्यासाठी एकजूट दाखविणाऱ्या नेत्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चिंता नाही. बँकेच्या निवडणुकीसाठी नेत्यांची एकजूट आणि ऊसदरासाठी शेतकऱ्यांची फरफट, ही जिल्ह्यातील राजकीय नेतृत्वाची खरी परिस्थिती आहे, अशी टीका शेट्टी यांनी केली. जिल्‍हा, तालुकास्‍तरावरील पदाधिकारी, नेत्‍यांची भाषणे झाली. सभा सुरू असतानाच खा. नीलेश लंके यांच्यासह शेतकरी संघटनांच्‍या काही पदाधिकार्‍यांची जिल्‍हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्‍याबरोबर चर्चा सुरू होती. सायंकाळी साडेपाच वाजता निवासी उपजिल्‍हाधिकारी दादासाहेब गिते आणि नायब तहसीलदार मयूर बेरड यांनी सभास्‍थळी जाऊन शेट्टी यांना जिल्‍हाधिकाऱ्यांचे पत्र दिले.

Sugarcane Farmers Protest
Ahilyanagar Municipal Employees Protest: दिवाळी अग्रीम अन् १३० कोटींच्या थकीत देण्यांसाठी महापालिका कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन

प्रशासनाने मंगळवारपासून ऊसतोडणी बंद ठेवण्‍याचे निर्देश साखर कारखानदारांना दिले आहेत. याशिवाय २६ रोजी साखर कारखानदारांची ऊसदराबाबत बैठक जिल्‍हाधिकारी कार्यालयात बोलावली आहे. कारखान्‍यांच्‍या अध्यक्षांना उपस्‍थित राहण्‍याचे निर्देश दिल्याचे या पत्रात नमूद केले आहे. प्रशासनाच्या सकारात्‍मक भूमिकेमुळे हे आंदोलन काही काळ स्‍थगित करत असल्‍याची घोषणा शेट्टी यांनी केली. मात्र, मागणीनुसार दर जाहीर न झाल्‍यास २८ रोजी पुन्‍हा आंदोलनाचा इशारा त्‍यांनी दिला. ऊस वाहतूकदारांनीही शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहावे. कारखानदारांकडून वाहतूकदारांची आर्थिक कोंडी किंवा जप्तीची कारवाई झाल्यास शेतकरी संघटनांचे पदाधिकारीच मदतीला धावून येतात, असेही त्‍यांनी म्‍हटले.

Sugarcane Farmers Protest
Wakdi Leopard Attack: वाकडीत बिबट्याचा गोठ्यावर हल्ला; सहा शेळ्या ठार, शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान

साखर उतार्‍याची चोरी करून शासनाची फसवणूक

जिल्ह्यात साखर उतारा सरासरी ११ पेक्षा अधिक असूनही उसाला भाव दिला जात नाही. कारखानदार साखर उतार्‍याची चोरी करून शेतकर्‍यांना आणि शासनालाही फसवत आहेत, असा आरोप शेट्टी यांनी भाषणात केला. देशातील पहिला साखर कारखाना असलेल्‍या या जिल्ह्याइतका दर इतरांनी देण्याची मागणी पूर्वी करत होतो. आता मात्र इथेच समाधानकारक दरासाठी आंदोलन करावे लागणे दुर्दैवी असल्‍याचे ते म्हणाले. दरम्यान, दोन दिवसांत प्रश्न मार्गी लागला नाही, तर जिल्ह्यात येणारे सर्व प्रमुख रस्ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल. असा इशाराही खा. नीलेश लंके यांनी भाषणातून दिला. महादेव जानकर यांनी शेतकऱ्यांना आपल्या हक्कासाठी स्वाभिमानाने लढण्याचे आवाहन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.