Rojgar Hami Yojana Pending Payments: रोहयोची १५ कोटींची देयके चार वर्षांपासून थकीत; पाथर्डीतील शेतकरी आर्थिक संकटात

गाय गोठे, शेळीशेड आणि विहिरींच्या साहित्याची बिले रखडली; कर्ज काढून कामे पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांवर व्याजाचा बोजा
Farmers Compensation
Farmers CompensationPudhari
Published on: 
Updated on: 

पाथर्डी: शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारकडून रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभाच्या विविध योजना राबविल्या जातात. मात्र, या योजनांमधून कामे पूर्ण करूनही लाभार्थी शेतकऱ्यांना साहित्याची बिले मिळत नसल्याने त्यांच्यावर दुष्काळामध्ये अजून भर म्हणून अधिकचे आर्थिक संकट ओढवले आहे. तालुक्यात गाय गोठे, शेळीशेड आणि विहिरींच्या कामांची कुशल घटकातील सुमारे १४ कोटी ९ लाखांची देयके सरकारकडे गेल्या चार वर्षांपासून थकीत आहेत. त्यामुळे शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेतलेले शेतकरी आता स्वतःच आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

Farmers Compensation
Sugarcane Farmers Protest: ३७०० रुपये पहिली उचल देण्याच्या मागणीसाठी ऊस उत्पादकांचा आक्रोश मोर्चा

रोहयोतून वैयक्तिक लाभाची कामे करताना कुशल आणि अकुशल अशा दोन घटकांत देयके अदा केली जातात. यामध्ये अकुशल घटकांतर्गत मजुरांच्या मजुरीची रक्कम, तर कुशल घटकांतर्गत कामासाठी लागणाऱ्या साहित्याची बिले दिली जातात. मजुरांची मजुरी अदा करण्यात आली असली, तरी साहित्य खरेदीसाठीची कुशल घटकातील देयके मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांनी स्वतःच्या पैशातून साहित्य खरेदी करून गोठे, विहिरी आणि शेळी शेडची कामे पूर्ण केली; मात्र त्यांना अद्याप शासनाकडून पैसे मिळालेले नाहीत.

Farmers Compensation
Fake Liquor Seizure: बनावट दारू निर्मिती व वाहतुकीवर कारवाई; १०.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त

सन २०२३-२४मध्ये ५ गाय गोठ्यांची, सन २०२४-२५मध्ये ८८ गाय गोठ्यांची आणि ६ शेळी शेडची, तर सन २०२५-२६ मध्ये ९२ विहिरी, २४० गाय गोठे आणि १५ शेळी शेडची साहित्याची बिले थकीत आहेत. याशिवाय सन २०२६-२७ मधील देयकेही अद्याप प्रलंबित आहेत. उपलब्ध माहितीनुसार, विहिरींची सुमारे १३ कोटी, गाय गोठ्यांची २ कोटी आणि शेळीशेडची ९ लाख रुपये अशी एकूण १५ कोटी नऊ लाखांची रक्कम लाभार्थ्यांना मिळणे बाकी आहे.

Farmers Compensation
Fodder Cultivation Scheme: चारा टंचाईवर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून चारा लागवड; हेक्टरी १.१३ लाखांपर्यंत तरतूद

एकीकडे सरकारकडून वैयक्तिक लाभाच्या नवीन कामांना मंजुरी दिली जात आहे. अनेक लाभार्थ्यांना कामे करण्याबाबत मंजुरीपत्रेही देण्यात आली आहेत. मात्र, यापूर्वीच्या कामांची बिले मिळालेली नसल्याने नवीन कामे करण्यास शेतकरी धजावत नाहीत. त्यातच नवीन कामांची कुशल घटकातील देयक मागणी वरिष्ठ कार्यालयाकडून करू नये, अशा सूचना दिल्या जात असल्याची चर्चा आहे. अनुदान उपलब्ध नसल्याने नवीन देयकांची मागणी करू नका, अशी भूमिका घेतली जात असल्याचे सांगितले जाते. नवीन कामांची बिले मागितल्यास थकीत देयकांचा आकडा आणखी वाढेल, या कारणामुळे मागणी प्रक्रियेलाच मर्यादा येत असल्याचे चित्र आहे. परिणामी, मंजूर झालेली कामे प्रत्यक्षात सुरू होत नाहीत. काही कामे रद्द होण्याचीही वेळ येत आहे.

सध्या तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. अशा परिस्थितीत रोहयोतील कोट्यवधींची देयके रखडल्याने लाभार्थ्यांचा आर्थिक ताण वाढला आहे. सरकारने थकीत कुशल घटकाची बिले तातडीने अदा करावीत आणि नवीन कामांसाठीही निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी लाभार्थी शेतकऱ्यांकडून होत आहे. दुष्काळाच्या संकटात तरी शासनाकडून आपले पैसे मिळणार का, असा सवाल आता लाभार्थी उपस्थित करीत आहेत.

Farmers Compensation
Ahilyanagar Municipal Employees Protest: दिवाळी अग्रीम अन् १३० कोटींच्या थकीत देण्यांसाठी महापालिका कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन

योजनेचा लाभ की डोक्यावर कर्जाचा डोंगर?

अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून, काहींनी साहित्य उधारीवर घेऊन, तर काहींनी उसनवारीने पैसे उभे करून गोठे व विहिरींची कामे पूर्ण केली. मात्र, चार वर्षांपासून अनुदानाची रक्कम मिळत नसल्याने साहित्य दुकानदारांकडून पैशांसाठी तगादा सुरू आहे. घेतलेल्या कर्जाचे व्याज दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी असलेली योजना अनुदानाअभावी त्यांना समृद्ध करण्याऐवजी कर्जबाजारी करणारी ठरत असल्याची संतप्त भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

सन २०२३-२४पासून गाय गोठ्याच्या कुशल साहित्याचे ६० हजार रुपये बिल पंचायत समितीच्या रोजगार हमी योजना विभागाकडे प्रलंबित आहे. अकुशल कामाची मजुरी मिळाली असून, साहित्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत.

देविदास आंधळे, गाय गोठा लाभार्थी, जिरेवाडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.