Fake Liquor Seizure: बनावट दारू निर्मिती व वाहतुकीवर कारवाई; १०.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त

दोन चारचाकी वाहनांसह बनावट मद्य, स्पिरीट, बुचे व निर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त; एकावर गुन्हा दाखल
Fake Liquor Seizure
Fake Liquor SeizurePudhari
Published on: 
Updated on: 

नगर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर येथील भरारी पथकाने बनावट विदेशी व देशी दारू निर्मिती तसेच वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करीत दोन चारचाकी वाहनांसह १० लाख ९२ हजार ४३८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Fake Liquor Seizure
Fodder Cultivation Scheme: चारा टंचाईवर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून चारा लागवड; हेक्टरी १.१३ लाखांपर्यंत तरतूद

श्रीरामपूर - नेवासा रोडवरील नेवासा बुद्रुक (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) येथील नामदेव फुलकर एच. पी. पेट्रोल पंपासमोर २२ नोव्हेंबर रोजी अवैधरीत्या बनावट दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून छापा टाकण्यात आला. यावेळी प्रमोद रमेश फुलारे (रा. वडारवाडा, वॉटर सप्लायसमोर, गोंधवणी वॉर्ड क्र. १, श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. घटनास्थळावरील अलिशान कारची तपासणी केली असता त्यात बनावट विदेशी दारू, बनावट ब्लेंड, बनावट बुचांचा जप्त करण्यात आला.

Fake Liquor Seizure
Ahilyanagar Municipal Employees Protest: दिवाळी अग्रीम अन् १३० कोटींच्या थकीत देण्यांसाठी महापालिका कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन

दरम्यान, आरोपीने चौकशीत सांगितल्यानुसार पथकाने खबडी मळा येथील कचरा डेपोसमोर (श्रीरामपूर) संशयितरित्या उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा बोलेरो पीकअप वाहनाची तपासणी केली.

Fake Liquor Seizure
Wakdi Leopard Attack: वाकडीत बिबट्याचा गोठ्यावर हल्ला; सहा शेळ्या ठार, शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान

वाहनाच्या पाठीमागील हौद्यात काळा गूळ पावडरच्या ५२ गोण्या, नवसागरचे १५ बॉक्स, विदेशी मद्याची ५,५५३ बनावट बुचे, ७ लिटर विदेशी मद्य ब्लेंड, ३५ लिटर कॅनमध्ये अंदाजे २० लिटर उग्र वासाचे स्पिरीट आणि २० लिटर देशी मद्याचा ब्लेंड कॅन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही ठिकाणावरून दोन वाहनांसह बनावट विदेशी दारू व साहित्य असा १० लाख ९२ हजार ४३८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Fake Liquor Seizure
Cattle Fodder Camp: दुष्काळात पशुधनासाठी ग्रामस्थांचा पुढाकार; भोसे येथे लोकसहभागातून चारा छावणी सुरू

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक ऋषिकेश इंगळे, उपअधीक्षक प्रवीणकुमार तेली, भरारी पथक दोनचे निरीक्षक एस. एस. हांडे, दुय्यम निरीक्षक एस. सी. मांडवेकर, पी. आर. गायकवाड, मोनिका शेवाळे, के. एम. सुळे, पी. एस. पाटील यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.