Hyderabad Balloon: हैदराबाद बलूनचा प्रवास अहिल्यानगरच्या आकाशातून होण्याची शक्यता

वैज्ञानिक संशोधनासाठी टाटा मूलभूत संशोधन संस्थेची उड्डाणे; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
hyderabad balloon flight
hyderabad balloon flightPudhari
Published on
Updated on

नगर: हैदराबाद येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या वतीने ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 या कालावधीत वैज्ञानिक संशोधनासाठी हवेतील बलून उड्डाणे करण्यात येणार आहेत. या बलूनपैकी काही बलूनची उपकरणे राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यांतील चौदा जिल्ह्यांतील विविध भागात पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. (Latest Ahilyanagar News)

hyderabad balloon flight
Waman Thange Baba: ८७ वर्षीय वामन ठाणगे बाबांचे शिक्षणप्रेम — शाळेच्या दारात दररोज नतमस्तक

बलून उड्डाणांसाठी भारत सरकारच्या परमाणु ऊर्जा विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (खडठज) यांचे सहकार्य लाभले आहे. ही बलून उड्डाणे हैदराबाद येथील ईसीआयएल परिसरातून केली जाणार असून, पहिले बलून उड्डाण ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. एकूण दहा बलून आकाशात झेपावतील.

hyderabad balloon flight
Balasaheb Thorat Speech: खोटा प्रचार करून तरुणांना भडकविण्याचे उद्योग — बाळासाहेब थोरातांचा घणाघात

या बलूनमध्ये बसवलेली वैज्ञानिक उपकरणे सुमारे 30 ते 42 किलोमीटर उंचीपर्यंत जातील आणि काही तास संशोधन करून पॅराशूटच्या साहाय्याने जमिनीवर उतरतील. वाऱ्याच्या दिशेनुसार ही उपकरणे 200 ते 350 किलोमीटर अंतरावर येऊ शकतात. त्यामुळे ती महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांतील भागांमध्ये उतरू शकतात, असे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

hyderabad balloon flight
Gang Caught: घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघडकीस; 33 लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील औरंगाबाद, बीड, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, सांगली, सातारा, अहिल्यानगर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, जळगाव आणि सोलापूर आदी चौदा जिल्ह्यांत उपकरणे पडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना सूचना दिल्या आहेत.

hyderabad balloon flight
Rain Aid: अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा! जिल्ह्यातील 8.53 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 10 हजारांची अतिरिक्त मदत

ज्या ठिकाणी ही उपकरणे सापडतील, त्या पॅकेजवर दिलेल्या पत्त्यावर त्वरित माहिती द्यावी तसेच जवळच्या पोलिस ठाण्याला व प्रशासनाला कळवावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. उपकरणे सुरक्षित असली तरी त्यामध्ये संवेदनशील वैज्ञानिक साधने असल्याने छेडछाड झाल्यास माहिती नष्ट होण्याची भीती आहे. पहिले बलून उड्डाण ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

hyderabad balloon flight
Golnimb Youth Death: गळनिंबमध्ये तरुणाचा मृत्यू; मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने उचलले टोकाचे पाऊल

बलूनचा व्यास 50 ते 85 मीटर

वाऱ्याच्या दिशेनुसार बलून उपकरणे 200 ते 350 किलोमीटर अंतरावर येऊ शकतात. या बलूनचा व्यास 50 ते 85 मीटर असून, ते हायड्रोजन वायूने भरलेले असतील. उड्डाणे रात्री 8 ते सकाळी 6.30 या वेळेत होणार आहेत. ज्या ठिकाणी ही उपकरणे सापडतील, ती हलवू वा उघडू नयेत किंवा छेडछाड करू नये. अशा उपकरणांची माहिती दिलेल्या नागरिकांना योग्य बक्षीस आणि खर्चाची भरपाई दिली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news