Bhanudas Kotkar: ज्येष्ठ काँग्रेस नेते भानुदास कोतकर यांचे निधन

वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; राजकीय, सहकार आणि कृषी क्षेत्रातील योगदानाचा ठसा
Bhanudas Kotkar
Bhanudas KotkarPudhari
Published on: 
Updated on: 

नगर तालुका: अहिल्यानगरच्या राजकीय, सहकार आणि कृषी क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत राहिलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, नगर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती, सुप्रसिद्ध संदीप उद्योग समुहाचे सर्वेसर्वा भानुदास एकनाथ कोतकर यांचे शनिवारी (दि.२४) निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना अहिल्यानगर येथील आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने शहरासह जिल्ह्यातील राजकीय आणि कृषी क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

Bhanudas Kotkar
Ahilyanagar District Bank Election: जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ओबीसी, महिला राखीव जागांवर चुरस

ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले. नगर पंचायत समितीचे सभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, नगर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आणि जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या. राजकारणासोबतच उद्योग क्षेत्रातही त्यांनी योगदान दिले. ते संदीप उद्योग समूहाचे संस्थापक होते.

Bhanudas Kotkar
Sugarcane Farmers Protest: गुहा येथे ऊसगाड्या रोखल्या; शेतकरी सेनेचे आंदोलन तात्पुरते स्थगित

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतनीकरणात आणि विकासकामांमध्ये भानुदास कोतकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. शेतकऱ्यांना कृषी मालाच्या विक्रीसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारातून नगर तालुयातील नेप्ती उपबाजार समितीची निर्मिती झाल्याचे सांगितले जाते. तसेच चिचोंडी पाटील येथेही उपबाजार समितीसाठी जागा घेऊन ठेवण्यात आली होती. या कामांतून कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांबाबतची त्यांची भूमिका अधोरेखित होते.

Bhanudas Kotkar
Darna Project Water Rotation: दारणा प्रकल्पातून रब्बीसाठी ३०, उन्हाळी पिकांसाठी ४८ दिवस पाणी आवर्तन

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातू असा परिवार आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेचे माजी महापौर संदीप कोतकर, उदयोजक सचिन कोतकर, अमोल कोतकर, माजी जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा सचिन जगताप यांचे ते वडील होते. माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांचे सासरे होते. माजी आमदार दिवंगत शिवाजीराव कर्डिले आणि माजी आमदार दिवंगत अरुणकाका जगताप त्यांचे ते व्याही होते. भानुदास कोतकर यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय, सामाजिक आणि कृषी क्षेत्रातील व्यक्तींमधून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या निधनाने जिल्ह्याच्या राजकीय आणि कृषी क्षेत्रातील एका ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वाची कारकीर्द संपुष्टात आली आहे.

Bhanudas Kotkar
Gold and Silver Price: सोन्याच्या दरात ४ हजार, तर चांदीत १५ हजारांची घसरण

भूषविलेली विविध पदे

  • सरपंच-ग्रामपंचायत, केडगाव १९८७ ते १९९२

  • उपसभापती -पंचायत समिती, नगर १९९५ ते १९९७

  • सभापती -पंचायत समिती, नगर १९९७ ते १९९८

  • संचालक - कृषी उत्पन्न बाजार समिती, अहमदनगर १९९९ ते २००४

  • नगर-नेवासा मतदार संघातून विधानसभेची निवडणूक २००१

  • संचालक -महाराष्ट्र गृहनिर्माण विकास मंडळ

  • (म्हाडा) २००२

  • अध्यक्ष -नगर तालुका काँग्रेस (आय),

  • अहमदनगर २००२

  • प्रभारी अध्यक्ष - नगर शहर काँग्रेस (आय),

  • अहमदनगर २००२ ते २००७

  • संचालक -अहमदनगर जिल्हा सहकारी बँक,

  • अहमदनगर २००३ ते २००८

  • नगरसेवक -महानगरपालिका,

  • अहमदनगर २००५ ते २०१०

  • अध्यक्ष -शहर जिल्हा काँग्रेस (आय) २००६ ते २०११

  • सभापती -कृषी उत्पन्न बाजार समिती,

  • अहमदनगर २००८ ते २०११

  • नगरसेवक -महानगरपालिका,

  • अहमदनगर २००८ ते २०१३

  • संचालक -मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी २००९

  • गटनेते -अहमदनगर महानगरपालिका २०१०

  • अध्यक्ष -अहमदनगर जिल्हा शहर काँग्रेस कमिटी

  • २०११ ते २०१६

  • संचालक -कृषी उत्पन्न बाजार समिती,

  • अहमदनगर २०११ ते २०१६

  • अध्यक्ष -भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी,

  • केडगांव १९९०

  • अध्यक्ष -भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, केडगांव

  • अध्यक्ष संस्थापक -भैरवनाथ नागरी पतसंस्था,

  • केडगांव १९९१

  • उपाध्यक्ष - जिल्हा सायकल असोसिएशन, महाराष्ट्र

  • अध्यक्ष- संजय गांधी निराधार योजना १ जानेवारी २००१

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news