Ahilyanagar Ashadhi Wari Fund: आषाढी वारीसाठी अहिल्यानगरला 3.86 कोटींचा निधी; वारकऱ्यांना मिळणार अत्यावश्यक सुविधा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेतून मंजुरी; पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी शौचालय, पाणी व वैद्यकीय सेवांची व्यवस्था
Wari
WariPudhari
Published on
Updated on

लोणी: आषाढी वारी पालखी सोहळ्यासोबत जिल्ह्यातून मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्याला ३ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी पत्रकाद्वारे दिली.

Wari
Nagar Taluka Water Scarcity: नगर तालुक्यात पाणीटंचाई तीव्र; 15 गावांना टँकरचा आधार, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

अहिल्यानगर जिल्ह्यातून संत निवृत्तीनाथ महाराज, संत एकनाथ महाराज, संत निळोबाराय महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज आदी पालख्या आणि दिंड्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जातात.

Wari
Kopargaon Jewellery Theft: कोपरगावात पॉलिशच्या बहाण्याने 3.11 लाखांचे दागिने लंपास; दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा

त्या पालखी सोहळ्यांत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी तात्पुरती शौचालये, स्वच्छतागृहे, स्नानगृहे, पिण्याच्या पाण्याची सोय, वैद्यकीय सुविधा, औषधे तसेच जलरोधक मंडप उभारणीकरिता निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनास सादरही करण्यात आला होता.

Wari
Ahilyanagar District Bank Election: जिल्हा बँकेत प्रशासकीय बदलामागे राजकारण? निवडणुकीपूर्वी त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती

महायुती सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत ३ कोटी ८६ लाख १० हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून याला प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. या निधीतून वारकऱ्यांसाठी सर्व सोयीसुविधा उभारण्यात येणार आहेत. मागील दोन वर्षांपासून विखे पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील पालख्यांना आणि वारकऱ्यांना प्रशासनाच्या माध्यमातून चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

Wari
Illegal Sex Determination Racket: श्रीरामपूर गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश; मेडिकल चालकाला पाच दिवसांची पोलिस कोठडी

दरम्यान, आषाढी वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. या सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या अहिल्यानगरच्या पालख्यांचा मान महत्त्वपूर्ण आहे. म्हणूनच या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांकरिता चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी उपलब्ध दिल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी आभार मानले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news