Ahilyanagar District Bank Election: जिल्हा बँकेत प्रशासकीय बदलामागे राजकारण? निवडणुकीपूर्वी त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती

गौतम निकाळजे यांच्याकडून अध्यक्षपद संभाजी निकम यांच्याकडे; जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चांना उधाण
Ahilyanagar District Bank
Ahilyanagar District BankPudhari
Published on
Updated on

नगर: जिल्हा बँकेच्या निवडणुकीपूर्वीच राजकीय हालचाली सुरू झाल्या असताना, प्रशासनातही त्याचे पडसाद उमटताना दिसू लागले आहेत. जिल्हा बँकेवर प्रशासक म्हणून जिल्हा विशेष लेखापरीक्षक गौतम निकाळजे यांची नियुक्ती केली होती. मात्र, अचानक त्रिसदस्यीय प्राधिकृत मंडळ नेमून निकाळजे यांच्याऐवजी अध्यक्षपद हे नाशिक विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांच्याकडे देण्यात आले आहे. बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदलाला राजकीय झालर असल्याची चर्चा आहे. दरम्यान, बँकेवर प्रशासक नियुक्त झाल्यानंतर निकाळजे यांचा पहिला सत्कार विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केला होता हे विशेष!

Ahilyanagar District Bank
Illegal Sex Determination Racket: श्रीरामपूर गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश; मेडिकल चालकाला पाच दिवसांची पोलिस कोठडी

राज्यातील १४ जिल्हा बँकांच्या संचालक मंडळांची मुदत संपल्यानंतर बहुतंश ठिकाणी त्या त्या जिल्ह्याच्या उपनिबंधकांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र, केवळ अहिल्यानगर जिल्हा बँकेत उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्याऐवजी विशेष लेखापरीक्षक गौतम निकाळजे यांची नेमणूक झाली होती. बँकेची आगामी निवडणूक लक्षात घेता, अंतर्गत गटबाजीतून असे राजकीय डावपेच खेळले जात असल्याची चर्चा होती. नेमणुकीनंतर निकाळजे यांचा पहिला सत्कार सभापती राम शिंदे यांनी केला होता. त्यामुळे या चर्चेला बळ मिळाले. मात्र, सहकार विभागाचे अधिकारी सक्षम असताना, त्यांना डावलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.

Ahilyanagar District Bank
Rahuri Defence Project: राहुरीत 15 हजार कोटींच्या संरक्षण प्रकल्पाची तयारी; 1,600 एकरांवर औद्योगिक वसाहतीचा आराखडा

या निर्णयामुळे आपल्यावर अविश्वास दाखवला जात असल्याची भावना सहकार विभागात निर्माण होऊन नाराजी वाढली होती. मात्र, उघड चर्चा नसली तरी वरिष्ठांपर्यंत हा प्रकार निश्चितच पोहचला होता. त्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे काही घडामोडी घडल्या आणि त्यानंतर नाशिक विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांनी नुकतेच आपल्या स्तरावरूनच नवे आदेश काढले.

Ahilyanagar District Bank
Maharashtra Bal Sangopan Yojana: बालसंगोपन योजनेसाठी १२० कोटींचा निधी मंजूर; दीड लाख लाभार्थ्यांना दिलासा

नेमका काय केला बदल..

संचालक मंडळांच्या अनुपस्थितीत बँकेचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी संस्थेवर प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त केलेल्या गौतम निकाळजे यांच्या नियुक्तीमध्ये बदल करण्यात आले आहेत. नव्या बदलानुसार आता प्राधिकृत अधिकारी समितीत तीन सदस्य असतील. यात सहनिबंधक संभाजी निकम हे स्वतः अध्यक्ष असतील. जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे आणि गौतम निकाळजी यांनाही या समितीत सदस्य म्हणून ‘स्थान’ दिल्याचे अध्यक्ष संभाजी निकम यांच्या आदेशात म्हटले आहे. हे सर्व झाले खरे, पण आधीच्या नियुक्तीने कोणी कोणाला शह दिला होता आणि नवी ‘तीन सदस्यीय प्राधिकारी’ रचना करून कोणी काटशह दिला, याबाबत राजकीय चर्वितचर्वण सुरू झाले आहे.

Ahilyanagar District Bank
Wari 2026: लंडन ते पंढरपूर व्हाया 11 देश, ‘ग्लोबल वारी’ ; 25 जुलैला पंढरपूरमध्ये पोहोचलणार

शिंदे यांना जिल्हा बँकेत रस

दोन वर्षांपूर्वी आमदार असतानाही प्रा. राम शिंदे यांचा फोटो बँकेच्या वार्षिक अहवालातून गायब होता. त्या सभेत शिंदे यांनी नाराजीही प्रकट केली होती. केंद्रात, राज्यात आणि बँकेतही आपली सत्ता; बँकेत भाजपाचा अध्यक्ष, तरी आपला फोटो अहवालात नाही, अशी खंत त्यांनी भाषणातून उघडउघड व्यक्त केली होती. त्याच वेळी ‘बँकेच्या निवडणुकीत मला लक्ष घालावे लागेल,’ असे जाहीरपणे सांगितले होते. त्याचा धागा पकडला तर काही दिवसांपासून शिंदे यांनी जिल्ह्यातील नेत्यांच्या घेतलेल्या भेटीगाठी आणि निकाळजे यांचा सत्कार, हे त्याचेच द्योतक समजले जात आहे. त्यामुळेच आता सभापती शिंदे स्वतः जिल्हा बँक निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news