Illegal Sex Determination Racket: श्रीरामपूर गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश; मेडिकल चालकाला पाच दिवसांची पोलिस कोठडी

डॉक्टर, एजंट आणि मेडिकल चालकांच्या साखळीतून बेकायदा लिंगनिदान; सोनोग्राफी मशीनसह कार जप्त
Fetal Determination
Fetal DeterminationPudhari
Published on
Updated on

श्रीरामपूर: गर्भवती महिलांची तपासणी केल्यानंतर गर्भलिंग निदान करण्यासाठी डॉक्टस, मेडिकलचालक आणि एजंट बेकायदा निदान करणाऱ्यांचा संपर्क नंबर आणि पत्ता देत. वेगवेगळ्य ठिकाणी जावून गर्भवतींचे बेकायदा लिंगनिदान केले जात असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. दरम्यान या घटनेत अटक केलेल्या घोगरगाव (श्रीगोंदा) मेडिकल चालक जालिंदर बोरूडे यास न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी सुनावली.

Fetal Determination
Rahuri Defence Project: राहुरीत 15 हजार कोटींच्या संरक्षण प्रकल्पाची तयारी; 1,600 एकरांवर औद्योगिक वसाहतीचा आराखडा

बेकायदा लिंगनिदान चाचणी व अवैध गर्भपात प्रकरणी पोलिसांनी श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथील मेडिकल चालक जालिंदर रामदास बोरुडे यास अटक केली. हातवळणमध्ये शेतामध्ये झोपडीत तो दडून बसला होता. त्याच्याकडून लिंगनिदानासाठी वापरण्यात येणारे व बेकायदेशीरपणे खरेदी केलेले सोनोग्राफी मशीन तसेच चारचाकी कार जप्त केली आहे.

Fetal Determination
Maharashtra Bal Sangopan Yojana: बालसंगोपन योजनेसाठी १२० कोटींचा निधी मंजूर; दीड लाख लाभार्थ्यांना दिलासा

जालिंदर बोरुडे याने किती गर्भलिंगनिदान चाचण्या केल्या?, डॉक्टर नसतानाही त्याने लिंग निदान मशीन कसे वापरले?, यात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे?, किती एंजट आहेत, ते कोण? याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी बोरुडेच्या कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली.

Fetal Determination
Wari 2026: लंडन ते पंढरपूर व्हाया 11 देश, ‘ग्लोबल वारी’ ; 25 जुलैला पंढरपूरमध्ये पोहोचलणार

त्यानुसार न्यायालयाने त्यास पाच दिवसांची कोठडी सुनावली. या गुन्ह्यात आतापर्यंत अटक केलेल्या एकाही आरोपीला दीड महिन्यानंतर अद्यापही जामीन मिळालेला नाही. आरोपी विरुद्ध सबळ पुरावे जमा करत अत्यंत सु्क्ष्मपणे गुन्ह्याचा तपास सुरू आहे.

Fetal Determination
Prajakta Tanpure MLC: अहिल्यानगरला विधान परिषदेत चौथे प्रतिनिधित्व; प्राजक्त तनपुरे यांचा प्रवेश

जिथे गर्भलिंग निदान करायचे त्या गावाला न्यायचे सोनोग्राफी मशीन

यापूर्वी अटक केलेल्या आरोपींच्या माहितीच्या आधारे पोलिस कारवाई करत आहेत. त्यानुसार आणखी काही संशयित निष्पन्न झाले आहेत. त्यांची चौकशी केली जात आहे. बेकायदेशीरपणे खरेदी केलेले सोनोग्राफी मशीन वेगवेगळ्या ठिकाणी नेत तेथे लिंगनिदान चाचण्या केल्या जात असल्याचे तपासात समोर आले आहे. एजंट, डॉक्टर्स, मेडिकल चालक हे गर्भवती महिलांना गर्भलिंग निदान करणाऱ्या आरोपींचा संपर्क नंबर व पत्ता देत असल्याचे देखील निष्पन्न होत असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयासमोर दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news