Kopargaon Jewellery Theft: कोपरगावात पॉलिशच्या बहाण्याने 3.11 लाखांचे दागिने लंपास; दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा

नामांकित कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून महिलेची फसवणूक; शिवाजीनगर परिसरातील घटना
Theft
TheftPudhari
Published on
Updated on

कोपरगाव: शहरात पुन्हा एकदा चोरट्यांनी आपली चलाखी दाखवत एका महिलेची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांना पॉलिश करून देण्याचे आमिष दाखवत तब्बल ३ लाख ११ हजार ९१० रुपयांचे दागिने लंपास केले. या प्रकारामुळे शिवाजीनगर परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Theft
Ahilyanagar District Bank Election: जिल्हा बँकेत प्रशासकीय बदलामागे राजकारण? निवडणुकीपूर्वी त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या सुहास लक्ष्मीकांत कुलकर्णी यांच्या घरी दोन अज्ञात व्यक्ती आले. आपण एका नामांकित कंपनीचे अधिकारी असल्याचे सांगत त्यांनी भांडी घासण्याच्या पावडरचा प्रात्यक्षिक (डेमो) दाखविण्यास सुरुवात केली. बोलण्यात गोडवा आणि वागण्यात विश्वासार्हता निर्माण करत त्यांनी घरातील महिलेशी संवाद साधला.

Theft
Illegal Sex Determination Racket: श्रीरामपूर गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश; मेडिकल चालकाला पाच दिवसांची पोलिस कोठडी

त्यानंतर सोन्या-चांदीच्या दागिन्यांना विशेष प्रकारची पॉलीश करून ते नव्यासारखे चकचकीत करून देतो, असे आमिष दाखवत त्यांनी महिलेकडून सोन्याच्या पाटल्या, बांगड्या व इतर दागिने घेतले. मात्र काही क्षणांतच या दोघांनी आपली खरी ओळख दाखवत संधी साधून दागिन्यांसह पोबारा केला.

Theft
Rahuri Defence Project: राहुरीत 15 हजार कोटींच्या संरक्षण प्रकल्पाची तयारी; 1,600 एकरांवर औद्योगिक वसाहतीचा आराखडा

फसवणुकीची बाब लक्षात येताच कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली. हा प्रकार गुरुवारी (दि. 4) १० ते ११ वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर सोनवणे करीत आहेत.

Theft
Maharashtra Bal Sangopan Yojana: बालसंगोपन योजनेसाठी १२० कोटींचा निधी मंजूर; दीड लाख लाभार्थ्यांना दिलासा

चोरट्यांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

दरम्यान, शहरात पुन्हा डोकेवर काढणाऱ्या चोरट्यांच्या टोळ्यांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांसमोर आरोपींना जेरबंद करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका

वाढत्या फसवणुकीच्या घटनांमुळे नागरिकांनी घरात येणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये, तसेच अशा संशयास्पद व्यक्तींची त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news