Ahilyanagar Development Ajit Pawar: अजितदादांमुळे अहिल्यानगरला सर्वाधिक निधी; विकासकामांतून शहराचे रूप पालटले – आ. काशिनाथ दाते

राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्व. अजितदादा पवारांना श्रद्धांजली; नगरच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाला आठवणींना उजाळा
Ahilyanagar Development Ajit Pawar
Ahilyanagar Development Ajit PawarPudhari
Published on
Updated on

नगर : अहिल्यानगरचे विकासकामांतून बदललेले रूप म्हणजेच स्वर्गीय अजितदादा होय. त्यांच्याच माध्यमातून नगरला आतापर्यंत सर्वाधिक निधी मिळाला, अशी कृतज्ञता आमदार काशिनाथ दाते यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या वतीने उपमुख्यमंत्री (स्व) अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.

Ahilyanagar Development Ajit Pawar
Ahilyanagar SSC: दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज; सीसीटीव्ही, झूम ॲप व पोलिस बंदोबस्त

माजी आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी उपमहापौर गणेश भोसले, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, राजेंद्र गुंड, संजय कोळगे, गटनेते प्रकाश भागानगरे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, अविनाश घुले, बाळासाहेब बारस्कर, बाळासाहेब पवार, संजय चोपडा, राजेंद्र गुंड, संजय कोळगे, सुरेश बनसोडे, अजिंक्य बोरकर, महेश तवले, डॉ. सागर बोरुडे, सुनील काळे, विपुल शेटीया, विजय गव्हाळे, मयूर बांगरे, केशव नागरगोजे, जालिंदर कोतकर, महेंद्र कांबळे, सुमित लोंढे, जितू गंभीर, गोरख पडोळे, संग्राम रासकर, जय भोसले, किसन भिंगारदिवे आदी.

Ahilyanagar Development Ajit Pawar
Ahmednagar Collector Office: अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ईमेलवर पुन्हा बॉम्ब धमकी, यंत्रणा सतर्क

अजितदादांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हतबल झाला असून सर्वसामान्य माणसाला अश्रू अनावर झाले आहेत. अजितदादा आणि अहिल्यानगर शहर यांचे अतूट नाते आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून घडले होते, अशा भावना या वेळी व्यक्त करण्यात आल्या. आमदार दाते म्हणाले की, शहराच्या इतिहासात एवढा मोठा निधी कधीही मिळाला नव्हता. तो निधी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून स्व. अजितदादा पवार यांनी अहिल्यानगर शहराच्या विकासासाठी दिला. वयाच्या 70व्या वर्षी दादांनी मला न्याय देत सर्वसामान्य कार्यकर्त्याला पारनेर मतदारसंघाचा आमदार केले.

Ahilyanagar Development Ajit Pawar
Ajit Pawar Death Tribute: अजित पवार यांच्या निधनाने नगर जिल्हा शोकमय; अनेक तालुक्यांत कडकडीत बंद

माजी आमदार चंद्रशेखर घुले म्हणाले, अजितदादांनी सर्वांत जास्त नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना न्याय आणि प्रेम दिले, म्हणूनच विकासाची कामे मार्गी लागली. दादांनी आपल्यावर टाकलेली जबाबदारी आपण पार पाडायची आहे.

माजी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले, माझ्या तीस-पस्तीस वर्षांच्या राजकारणाच्या कार्यकाळात कधीही एवढा मोठा निधी मिळाला नव्हता. तो निधी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून अजितदादांनी दिला. माझ्या प्रभागामध्ये नगरकरांच्या हक्काचे हॉस्पिटल व क्रीडा संकुलाचे काम पूर्ण झाले. हे काम अजितदादा यांच्या माध्यमातून पूर्ण झाले. त्यांच्या हस्तेच या वास्तूंचे उद्घाटन करायचे होते, मात्र ते स्वप्नच राहिले.

Ahilyanagar Development Ajit Pawar
Ahilyanagar Women Harassment Case: सावेडीतील निर्मलनगरमध्ये महिलांचा छळ; सूरज काळेविरोधात गुन्हा

शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर म्हणाले, स्वर्गीय अजितदादा यांच्या निधनामुळे सर्वपक्षीय शोकसभा दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सहकार सभागृह येथे होणार आहे. जातिपातीच्या पलीकडचा माणूस म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी राजकीय वाटचालीत संघर्ष केला. आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून अजित दादांची स्नेहाचे संबंध आले आणि नगरकरांच्या विकासाची वाट मोकळी झाली. निवडणुकीच्या काळात आपण जनतेसमोर मते मागण्यासाठी जात होतो, तेव्हा मतदारांना केलेल्या विकासकामांची आठवण करून दिली जात होती, ही अभिमानाची गोष्ट होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news