Ahilyanagar NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची नगरमध्येही चर्चा; मुंबईतून पदाधिकाऱ्यांना फोन, कार्यकर्त्यांच्या मेळाव्याची तयारी

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास जिल्ह्यात राजकीय समीकरणे बदलणार; काही मतदारसंघांत स्थानिक नेतृत्वापुढे पेच, भाजपचे वर्चस्व कायम राहण्याचे आव्हान
NCP
NCPPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी विलीनकरणाच्या चर्चेची ‘तुतारी’ जोरदार वाजत असतानाच नगरमध्ये टीकटीक वाढली आहे. मुंबईतून जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना आलेले फोन त्यामागील कारण ठरत आहे. अनेक पदाधिकाऱ्यांकडून फोन आल्याची कबुली दिली जात असून लवकरच कार्यकर्त्यांचा मेळावा होणार असल्याचेही सांगितले जात आहे.

NCP
Ahilyanagar Water Wastage: अहिल्यानगरमध्ये पाण्याची नासाडी करणाऱ्या १६ जणांना दंड; महापालिकेची धडक कारवाई

नगरपालिका, नगर परिषदा व जिल्हा बँकेतील राजकारणालाही राष्ट्रवादी विभागणीचा फटका बसला. अहिल्यानगर जिल्हा कधीकाळी एकसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. पक्ष विभागणीनंतर जिल्ह्यात आमदार रोहित पवार आणि खासदार नीलेश लंके वगळता एकही बडा नेते शरद पवारांसोबत नाही. माजी आमदार चंद्रशेखर घुले, आमदार संग्राम जगताप, आमदार किरण लहामटे, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, अरूण तनपुरे, सीताराम गायकर असे बडे नेते अजित पवारांसोबत गेले होते. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीलाही मर्यादा आल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी एकसंघ असताना २०१९ च्या निवडणुकीत पक्षाचे सहा आमदार होते. २०२४ मध्ये ती संख्या चारवर आली. रोहित पवार हे एकमेव शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार झाले. तुलनेत भाजप व शिवसेनेची संख्या मात्र वाढली.

NCP
Sujay Vikhe Patil: संयम, मुत्सद्देगिरी अन् अचूक राजकीय खेळी; सुजय विखेंचा जिल्हा बँकेत 'सुजय’!

..भाजप मोठा भाऊ

डिसेंबर २०२५ मधील १० नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीत शहरी मतदारांनी दोन्ही राष्ट्रवादीला नाकारल्याचे समोर आले. शेवगावमध्ये होमग्राऊंड असतानाही चंद्रशेखर घुलेंना अपयश आले. तेते शिवसेना शिंदे गटाच्या माया अरूण मुंडे नगराध्यक्ष झाल्या. कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांना सभापती राम शिंदे यांनी ताकद दाखवून दिली. कोपरगावात आ. आशुतोष काळेंना पालिका राष्ट्रवादीकडे आणता आली नाही. राहुरी ही एकमेव नगरपालिका प्राजक्त तनपुरेंनी घेतली, मात्र तेही आता भाजपात गेले आहेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी बॅकफूटवर असल्याचे स्पष्ट आहे. याउलट भाजपाने सात नगरपालिका ताब्यात घेतल्या, तर शिवसेनेनेही पकड वाढवल्याचे दिसले. जिल्हा बँकेतही गत पंचवार्षिकमध्ये दहा संचालक होते. अध्यक्षपदीही राष्ट्रवादीकडेच होते. आता मात्र केवळ सहा जागा मिळाल्या. काँग्रेसचे चार संचालक असतानाही त्यांच्याकडे उपाध्यक्ष पद गेले.

NCP
Sonai Tempo Crime: सोनईत भरदिवसा टेम्पो चालकाची चाकूने भोसकून हत्या; मारेकरी पसार

विलीनीकरण ठरते अडचणीचे

यदाकदाचित दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर कार्यकर्त्यांना ताकद मिळेल, पण राजकीय गुंताही वाढणार आहे. पारनेर, शेवगाव, अहिल्यानगर शहर, श्रीगोंदा, अकोलेतील स्थानिक नेतृत्वाची मात्र अडचण होण्याची चिन्हे आहेत. राहुरीत तर नवनेतृत्वाचा शोध घ्यावा लागेल, असे चित्र आहे. कोपरगावातही मनोमिलनाची साशंकता व्यक्त होते.

NCP
Nagar District Cooperative Bank: नगर जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी डॉ. सुजय विखे पाटील; रणजितसिंह देशमुख उपाध्यक्षपदी बिनविरोध

पक्ष प्रमुख हे शरद पवार निर्णय घेतील. मात्र, आमची विचारधारा पुरोगामी आहे. पूर्वी बाहेर पडलेले ते आमचेच होते, आणि आज ते विचार म्हणून पुन्हा सोबत येणार असतील तर निश्चितच आनंद आहे. दोन्ही पक्ष एकत्र आल्यास जिल्ह्यातही ताकद वाढेल.

प्रा. सीताराम काकडे, जिल्हाध्यक्ष, शरद पवार राष्ट्रवादी

विलिनीकरणाबाबत पक्ष नेतृत्वाला कळवले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार निर्णय घेतील. तो सर्वांना मान्य असेल, सोबतच तो कार्यकर्त्यांसाठीही आनंदाचा असेल.

अशोक सावंत, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.