Nagar District Cooperative Bank: नगर जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी डॉ. सुजय विखे पाटील; रणजितसिंह देशमुख उपाध्यक्षपदी बिनविरोध

सहकार विकास आघाडीचे १८ संचालक निवडून आल्यानंतर अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत एकमत; सभापती राम शिंदे यांच्याकडून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान
Sujay Vikhe Patil Ranjitsinh Deshmukh
Sujay Vikhe Patil Ranjitsinh DeshmukhPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदी सहकार विकास आघाडीचे नेते तथा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, तर व्हा. चेअरमनपदी रणजितसिंह देशमुख यांची बिनविरोध निवड झाली. निवड होताच विखे समर्थकांनी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.

Sujay Vikhe Patil Ranjitsinh Deshmukh
Mohatadevi Temple: दिवाळी पाडवा, भाऊबीजेला मोहटादेवी गडावर भाविकांचा भक्तिसागर; नियोजनामुळे सुलभ दर्शन

जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात व माजी मंत्री शंकरराव गडाख हे सहकार विकास आघाडीच्या नावाखाली एकत्र आले. या आघाडीला १८ जागा मिळाल्या. विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांना दोन आणि परिवर्तन आघाडीचे नेते खासदार नीलेश लंके यांना एक असे संख्याबळ निकालातून पुढे आले होते.

Sujay Vikhe Patil Ranjitsinh Deshmukh
Nilwande Dam Water Release: रब्बी पिके आणि पशुधन वाचविण्यासाठी निळवंडे धरणातून तातडीने आवर्तन सोडा

बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी गुरुवारी (दि.१२) सकाळी ११ वाजता बैठक बोलावण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच राजकीय घडामोडींना वेग आला होता. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, सभापती प्रा. राम शिंदे, माजी मंत्री शंकरराव गडाख बँकेत पोहचले. ‘चेअरमन’च्या कॅबीनमध्ये सर्व संचालक एकत्र बसवले गेले. त्यांच्यात निवडीबाबत चर्चा घडवून आणली गेली. व्हा. चेअरमनच्या ॲन्टीचेंबरमध्ये मंत्री विखे, सभापती शिंदे, माजी मंत्री थोरात, गडाख यांची बंद दाराआड चर्चा झाली. यात सर्वानुमते डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

Sujay Vikhe Patil Ranjitsinh Deshmukh
Sujay Vikhe Patil: जिल्हा बँकेचे नवे पदाधिकारी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार? सुजय विखे पाटलांचे संकेत

त्यानंतर शंकरराव गडाख यांनी सर्व संचालकांना अध्यक्ष पदी डॉ. सुजय विखे, तर उपाध्यक्ष पदी रणजितसिंह देशमुख यांचे नाव वरिष्ठांनी दिल्याचे कळवले. टाळ्यांच्या गजरात संचालकांनीही या निर्णयाचे स्वागत केले. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक प्रक्रियेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी एकेक अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली. शंकरराव गडाख, बिपीनराव कोल्हे, आ.आशुतोष काळे, करण ससाणे, आ.अक्षय कर्डीले, आ.प्राजक्त तनपुरे, गणपत सांगळे, वैभव पिचड, दत्ता पानसरे, सचिन घुमरे, सचिन जगताप, कारभारी जावळे, आ.मोनीका राजळे, अनुराधा नागवडे, राजश्री घुले, संगीता वाघ, संजीवनी शिंदे, ज्योती शिंदे हे २० संचालक उपस्थित होते. खा. नीलेश लंके यांनी निवडीकडे पाठ फिरवल्याचे दिसले.

Sujay Vikhe Patil Ranjitsinh Deshmukh
Godavari Canal Water Release: कोपरगावच्या शेतकऱ्यांच्या पाठपुराव्याला यश; गोदावरी कालव्यांना २० नोव्हेंबरपासून पाणी

सभापती राम शिंदे यांच्याकडून विखे, देशमुखांचा सन्मान

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान खटके उडाल्यानंतर दिवाळीत गोडवा निर्माण झाल्याने विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील व उपाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांचा सन्मान केला. हा त्यांचा मनाचा मोठेपणा म्हणत डॉ. सुजय विखे पाटील यांनी सभापती शिंदे यांचे आभारही मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.